शेडनेटमध्ये काकडीचं पीक-तीन महिन्यात लाखोंचा नफा.....
पुणे: इंदापूरच्या तानाजी शिंगाडे या तरुण शेतकऱ्यानं पारंपरिक शेतीत बदल केले.
नियंत्रित शेतीची कास धरली. शेडनेटमध्ये काकडीचं पीक घेतलं आणि अवघ्या तीन
महिन्यात लाखोंचा नफा कमावला.
कशी साधली तानाजीने
ही किमया?
पुणे जिल्ह्यातील
इंदापूरचे तानाजी शिंगाडे. एक तरुण आणि प्रयोगशील शेतकरी. इथल्या कडबनवाडीत वडीलोपर्जित १६ एकर शेती आहे.
यात पूर्वी डाळिंबाचं पीक होतं. मात्र विविध किडी आणि त्यानंतर आलेल्या तेल्यानं
बागेवर हल्ला केला. उत्पन्न मिळेनासं झालं. अशातच नियंत्रित शेतीची माहिती मिळाली.
शेडनेट उभं करण्याची कल्पना वडिलांना दिली. मात्र खर्च जास्त असल्यानं सुरुवातीला
वडिलांनी नकार दिला. मात्र शेडनेट उभारणीसाठी एकात्मिक फलोत्पादन अभियानातून मदत
मिळत असल्यानं वडीलांनी संमती दिली.
तानाजी शिंगाडे यांनी
बाजाराचा व्यवस्थित अभ्यास केला. काकडीचा पर्याय निवडला. जमिनीची मशागत करुन बेड
तयार केले. याला सेंद्रीय तसंच रासायनिक खतांचे बेसल डोस दिले. मल्चिंग पेपर
अंथरला, त्याला २ फुटांवर भोकं पाडून घेतली. ठिबकच्या
ड्रिपलाईन अंथरल्या. दोन बेडमध्ये ४५ सेंमी अंतर सोडलंय. पुण्याहून ८ रुपयांना एक
याप्रमाणं काकडीचं बी आणलं. ४० गुंठ्यासाठी त्यांना ८ हजार बिया लागल्या. बी महाग
असल्यानं घरच्या घरीच लागवड केली .
ठिबकमधून खतं आणि
पाणी दिल्यानं रोपांची उगवण चांगली झाली. २० दिवसात तारकाठी केली. अवघ्या ३५ व्या
दिवशी काकडी तोडणीस आली. सध्या दिवसाआड दीड ते दोन टन काकडीची तोडणी होतेय. ही
काकडी क्रेटमध्ये भरुन मुंबई बाजारात पाठवली जाते.
*आतापर्यंत १४ टन काकडीचं उत्पादन मिळालं आहे.
*ही काकडी बाजारात २५ ते ३० रुपये किलोनं विकली गेलीय
*यातून तानाजी यांना २ लाख ८० हजार रुपये मिळाले आहेत.
*अजून २ महिने तोडा सुरु राहणार असून यातून ३५ टन काकडीच्या उत्पादनाची अपेक्षा
तानाजी शिंगाडे यांना आहे.
*म्हणजेच तानाजी यांना अजून ७ लाख हजार रुपये मिळतील
*यातून बँकेचा हप्ता, बियाणं, खतं, किडनाशकं, वाहतूक असा २ लाख ५० हजारांचा खर्च आला.
*म्हणजेच तानाजी शिंगाडे यांना या काकडीतून अवघ्या ३ महिन्यात ७ लाखांचा निव्वळ
नफा होईल.
शेतीत सतत प्रयोग करत
राहण्याची तानाजी शिंगाडे यांची वृत्ती. वडील पारंपरिक शेती करत असले तरी त्यांची
समजूत काढून त्यांनी शेतीत बदल केले. नियंत्रित शेतीचा मार्ग निवडला. बाजाराचा
अभ्यासातून काकडीचं पीक निवडलं. अवघ्या ३ महिन्यात या काकडीनं तानाजी शिंगाडेंना
पंचक्रोशीत फेमस केलंय.
---*---
3 महिन्यात 40 हजार, भरघोस
उत्पन्न देणारी गाजर शेती!

सांगली: सांगली-तासगाव राज्य मार्गावरचं कवलापूर एक द्राक्ष उत्पादक गाव. मात्र गेल्या
काही काळापासून इथं गाजराचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातंय. कमी कालवधीत, कमी खर्चात चांगलं उत्पादन मिळत असल्यानं शेतकरी गाजर पिकाखालील क्षेत्रात वाढ
करत आहेत.
कवलापूर या 32 हजार लोकसंख्येचं गावात, अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर शेती होते. यातील सरासरी अडीचशे हेक्टरवर यंदा
गाजराची लागवड झाली आहे.
गावातीलच दत्तात्रय
माळी अनेक वर्षापासून या दीड एकरावर गाजराचं पीक घेतात.कमी कालावधीत चांगला नफा
देणारं हे पीक. त्यामुळंच यंदा त्यांनी गावातील तब्बल ३० एकर शेती भाडे तत्त्वावर
घेऊन यात गाजराची लागवड केली.
दत्तात्रय माळी यांनी
सप्टेंबर महिन्यात जमिनीची चांगली नांगरट केली. शेणखत घालून जमीन भुसभुशीत केली.
आणि यात गाजराचं बियाणाची लागव़ड केली. लागवडीसाठी त्यांना एकरी १० ते १२ किलो
गाजराचं बियाणं लागलं. यानंतर रासायनिक खताचा हप्ता दिला. १५ दिवसाच्या अंतरानं
पाणी दिलं. ८ ते १० दिवसात रोपांची उगवण झाली. ३ महिन्यात ही गाजरं जमिनीत पोसतात.
यानंतर यांची पानं काढून टाकली जातात. आणि गाजराची काढणी सुरु होते.
गाजरांचं वॉशिंग
सेंटर. गाजरं धुण्यासाठी गावानं केलेला हा जुगाड. इथं एका ड्रममध्ये गाजरं टाकतात.
५ हॉर्स पॉवरच्या मोटारीवर ड्रम फिरतो. पाण्याच्या मदतीनं ड्रममधील गाजरं स्वच्छ
होतात. यानंतर गाजरं पोत्यात भरून बाजारात रवाना केली जातात.
दत्तात्रय यांना
गाजराचं एकरी सरासरी ७ ते ८ टन उत्पादन मिळतं
बाजारात १० किलो
गाजराला ७० ते ११० रुपयाचा दर मिळतो
बियाणं,मजूरी,वाहतूक, खतं, जमिनीचं भाडं असा ३० ते ४० हजाराचा खर्च होतो.
एकरी ४० हजारांचं
निव्वळ उत्पन्न त्यांना शिल्लक राहतं.
म्हणजेच ३० एकरातून
अवघ्या ३ महिन्यात दत्तात्रय यांना ९ ते १० लाखांचा नफा ही लाल गाजरं मिळवून
देतात.
द्राक्ष, ऊस अशी पिकं पंचक्रोशीत घेतली जातात. मात्र या पिकांपासून उत्पन्न
मिळवण्यासाठी किमान वर्षभर थांबावं लागतं. शिवाय उत्पादनखर्चही भरमसाठ होतो. यावरच
उपाय शोधत दत्तात्रय यांनी नगदी पिकांना कमी कालावधीच्या गाजराचा पर्याय दिलाय.
---*---
पॉलिहाउसमधील ढोबळीला लाभले रंग यशाचे
Friday, December 30, 2016 AT 06:00 AM (IST)
Tags: agro special
उसाच्या पट्ट्यात २० गुंठे पाॅलिहाउस उसाचेही एकरी १००
टनांपुढे उत्पादन
आडसाली उसाचे एकरी १०० टनांपर्यंत उत्पादन तानाजी इंगळे (पुणदी, जि. सांगली) घेतातच. मात्र, शेतीत वेगळे काही करताना उसापेक्षा कमी कालावधीत काही पटींनी अधिक उत्पन्न देणारे पीक त्यांनी शोधले. २० गुंठ्यात पाॅलिहाउसमध्ये रंगीत ढोबळी मिरचीचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत उसापेक्षा चांगल्या पटीत उत्पन्न मिळवले. यंदाही एकरी २५ टन उत्पादनाच्या उद्दिष्टासह त्यांनी या पिकाचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले आहे.
श्यामराव गावडे
सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीकाठावर असणारे पुणदी गाव (ता. पलूस) किर्लोस्करवाडीच्या औद्योगिक कारखान्यापासून सहा किलोमीटरवर आहे. हा भाग ऊस पिकाचा म्हणून ओळखला जातो. गावातील तानाजी यशवंत इंगळे यांचे पत्नी व दोन मुले असे चौकोनी कुटुंब. वडिलाेपार्जित सव्वा एकर जमीन त्यांच्या वाट्याला आली. थोडी असली तरी ही शेती ते चांगल्या प्रकारे करू लागले. हे करीत असताना गावपातळीवर इलेक्ट्रीक उपकरणे दुरुस्तीचेही कामही करायचे. पुढे ते काम बंद केले. स्वतःच्या शेतीच्या जोडीला काही जमिनी खंडाने केल्या. चांगल्या नियोजनामुळे शेतीतून चांगली शिल्लक राहू लागली. त्यातूनच चार एकरांपर्यंत जमीन खरेदी केली.
ऊस शेतीत बदल
पाच एकर क्षेत्र झाल्यावर इंगळे यांनी पारंपरिक ऊसशेतीत बदल केला व नवीन वाट चोखाळली. त्यासाठी शेतीचे सुरवातीपासून नियोजन केले. यात मातीपरीक्षणाला प्राधान्य दिले. त्यातून जमिनीला गरजेएवढीच अन्नद्रव्ये देऊ लागले. जमिनीतील सेंद्रिय कर्ब महत्त्वाचा असतो. हे महत्त्व लक्षात घेऊन तो वाढण्यासाठी ताग, धैंच्या या हिरवळीच्या खतांचा वापर सुरू केला.
उत्पादन वाढले
पारंपरिक पद्धतीत सुधारणा करताना रोप लावण, रुंद सरी पद्धतीही अवलंबली. तीन फूट सरीवरून ती सहा फुटांपर्यंत नेली. सुरवातीला उसाचे एकरी असलेले ८० टनांपर्यंतचे उत्पादन पुढे ९७, १०० टनांपर्यंत पोचवण्यात इंगळे यशस्वी झाले. यंदा तर त्यांनी एकरी १२३ टनांपर्यंत बाजी मारली आहे. ऊस व्यवस्थापनात प्रामुख्याने को ८६०३२ वाणाचे आडसाली लागवड व खोडवा पीक घेतात. दोन रोपांतील अंतर दीड ते दोन फूट असते. ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ यांच्या शिफारशीनुसार अन्नदव्यांचा वापर होतो.
हिरव्या ढोबळी मिरचीचा प्रयोग
उसाचे एकरी उत्पादन चांगले असले तरी त्यातून मिळणारे उत्पन्न हे एकावेळी मिळणारे आहे हे लक्षात आले. दरम्यान, इंगळे यांची दोन्ही मुले विजय व अमोल पदवीधर होऊन वडिलांना शेतीकामांत मदत करू लागली. नव्या पिढीचे विचारही नवेच असतात. त्यांनी हिरव्या ढोबळी मिरचीचे पीक घेण्याचे ठरवले. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी ५० गुंठ्यांत खुल्या क्षेत्रात हे पीक घेतले. त्यातून ३० टन उत्पादन मिळाले. किलोला ४० ते ६५ रुपयांपर्यंत दर मिळाला. साधारण सव्वा आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
२० गुंठ्यात पॉलिहाउस
या प्रयत्नातून आत्मविश्वास वाढला. त्या पुढील वर्षी म्हणजे मागील वर्षी पॉलिहाउसमध्ये लाल व पिवळ्या रंगीत ढोबळी मिरचीची लागवड करण्याचे ठरले. २० गुंठे पॉलिहाउससाठी सुमारे १७ लाख रुपये खर्च आला. उत्तमपणे पीक जोपासना करण्याची इंगळे यांची वृत्ती होती. ती या प्रयोगातही कामी आली. सुमारे ६६०० रोपे लावली. सलग ११ महिने प्लॉट चालला. २० गुंठ्यांत २३ टन उत्पादन मिळाले.
मार्केट, दर व ताळेबंद
मुंबईच्या दादर मार्केटची बाजारपेठ मिळाली. प्रतिकिलो ३० रुपयांपासून ते कमाल १२० रुपयांपर्यंत दर मिळाला. मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून ५० किलोचे बॉक्स पाठवले जात. व्यापारी ते मुंबईत काढून घेत. हमाली, तोलाई, वाहतुक आदी रक्कम वजा करता प्रतिकिलो ४८ रुपयांपर्यंत सरासरी मध्य दर मिळाला. एकूण उत्पन्न साधारण ११ लाख रुपयांपर्यंत मिळाले. खर्च वजा जाता पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न हाती राहिले. या पिकात आपण नक्की चांगले उत्पादन घेऊ शकतो, याचा विश्वास आल्यानंतर यंदा २० गुंठ्यांत २५ टन उत्पादनाचे टार्गेट ठेऊन लाल- पिवळ्या मिरचीची लागवड केली आहे. सध्या ७० दिवसांचे पीक आहे.
प्रयोगाचे केले विश्लेषण
इंगळे म्हणाले, की ऊसशेतीतून १७ महिन्यांच्या काळात एकरी १०० टन उत्पादनातून फार तर एक लाख ७० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. पॉलिहाउसमधील रंगीत ढोबळी ११ महिन्यांतच त्याच्या चार ते पाचपटीने उत्पन्न देऊ शकते. खुल्या शेतातील ढोबळीपेक्षा पॉलिहाउसमधील ढोबळीचा प्लॉट जास्त दिवस चालवता येतो. गुणवत्ताही चांगली मिळते. शिवाय उत्पादनही अधिक मिळाले. कीडनाशकांच्या फवारण्याही तुलनेने कमी लागल्या. ज्यावेळी खुल्या शेतातील हिरव्या मिरचीला किलोला ६० रुपये दर सुरू होता, त्या वेळी रंगीत मिरचीला १२० रुपये दर सुरू होता, असेही त्यांनी सांगितले.
गुणवत्तावाढीसाठी
घरी देशी गाय. तिचे शेण, मूत्र यांचा वापर. जीवामृतावर अधिक भर. ठिबक सिंचनाद्वारेही ते फिल्टर करून दिले जाते. झाडांच्या मुळाशी ओतले जाते. त्यामुळे पानांचा व फळांचा तजेलदारपणा वाढला, असे इंगळे म्हणाले. त्यांनी पिकवलेल्या लाल मिरचीचे वजन २०० ते ३०० ग्रॅम तर पिवळ्या मिरचीचे वजन २२५ ते ३०० ग्रॅमपर्यंत मिळाले.
आर्थिक प्रगती साधली
इंगळे यांनी कुटुंबाच्या मदतीने शेती फुलवताना कुटुंबाची आर्थिक प्रगतीही साधली आहे. शेती उत्पन्नातून जमीन खरेदी केलीच. शिवाय टुमदार घर साकारले. ट्रॅक्टर खरेदी केला आहे. दोन्ही मुलांव्यतिरिक्त पत्नी सौ. गोकुळा यांचीही शेतीत मोठी मदत होते.
शेतीत कष्ट, प्रामाणिकपणा व प्रयोगशीलता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यातून निश्चित यशस्वी होता येते.
तानाजी इंगळे
इंगळे यांच्या शेतीतील ठळक बाबी
-दरवर्षी मातीपरीक्षण गरजेचे.
-उसात रुंद सरी पद्धतीचा अवलंब
-रोपे पद्धतीने लागवड
-जीवामृत, शेणखताच्या वापरावर भर
-संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन
-सच्छिद्र पाइपांचा वापर
तानाजी इंगळे- ९८६०७०७२८३, ९५६१९३९६६३

No comments:
Post a Comment