Sunday, 12 February 2017

प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा...भाग-1-(ॲग्रोवन व लोकसत्ता या वृत्तपत्रातून संकलित)



शेतीगोपालनात मिळतोय आनंदअमित गद्रे
Sunday, June 12, 2016 AT 12:00 AM (IST)-Tags: agro special
पुण्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत असणाऱ्या आनंद उंडे या तरुणाने वडिलोपार्जित शेती आणि गीर गायींच्या संगोपनाकडे चांगले लक्ष दिले आहे. दर शनिवाररविवार शेती आणि गोठ्याच्या नियोजनातून शाश्वत शेतीकडे त्याने पाऊल टाकले. शेती आणि पशुपालनासाठी मित्रांची चांगली साथ मिळाली आहे. 
पुणे शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या पणदरे (ता. बारामती) गावात आनंद शशिकांत उंडे याची वडिलोपार्जित शेती आहे. वडिलांच्या बरोबरीने त्यांचे शेतीवर जाणे असायचे. शिक्षण पूर्ण झाल्यावर आनंद माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीमध्ये रुजू झाला. वडिलांचे निधन झाल्याने नोकरी सांभाळत गेल्या सहा वर्षांपासून आनंदने दर शनिवार- रविवार गावी जात शेती सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. मित्रांचीही चांगली साथ मिळाली.


गीर गायींच्या संगोपनाला सुरवात ः
शेती सुधारण्याबरोबरीने आनंदचे लक्ष गीर गायींच्या संगोपनाकडे गेले. यासाठी कारण ठरले ते दै. ॲग्रोवनचे देशी गोवंश चर्चासत्र. याबाबत आनंद म्हणालाकी चर्चासत्रामध्ये गायींच्या संगोपनाची माहिती मिळाली. पशुपालकांच्या गोठ्याला भेट देऊन व्यवस्थापन समजाऊन घेतले. वलसाड (गुजरात) येथील शेतकऱ्याने ओएलएक्सवर गीर गायींची माहिती दिली होती. मी तेथे जाऊन जातिवंत गीर गाय निवडली. पशुतज्ज्ञांकडून गाय आणण्याचे सोपस्कार पूर्ण केले. अॉक्टोबर२०१४ मध्ये दसऱ्याला गीर गाय आणली. दुसऱ्या वेताची गाभण गीर गाय मला वाहतूक खर्चासह ५४ हजार रुपयांना पडली. शेतातील वातावरणात रुळल्यानंतर ही गाय प्रति दिन सात लिटर दूध देऊ लागली. माझी तीन एकर शेती सांभाळण्यासाठी गडी असल्यामुळे गायीचे संगोपन सोपे झाले. दर आठवड्याला शनिवार- रविवार शेतीवर राहून शेती आणि गायीच्या पुढील संगोपनाचे नियोजन सुरू झाले. गायीला कालवड झाली. गावातील ओळखीच्यांना दररोज दुधाचा चाळीस रुपये लिटर या दराने रतीब सुरू केला. यातून किमान व्यवस्थापन खर्च निघू लागला. शेतीला शेणखतगोमूत्राची सोय झाली. वर्षभरात ग्राहकांच्याकडून दुधाची मागणी सुरू झाली. याच काळात पुण्यात मित्रांच्या सहकार्याने देशी गायींच्या दुधाच्या मागणीचा अभ्यास केला आणि टप्प्याटप्प्याने गुजरातमधून गीर गायी आणल्या. पैशाची जुळणी करून शेताजवळ मुक्त संचार गोठ्यासाठी १५ गुंठे जागा घेतली. तेथे कूपनलिकेला पाणी लागले. सध्या गोठ्यात ३० गायी२२ वासरे आहेत. गायी आणि वळूच्या पशुवैद्यकाकडून तपासण्या केल्या. गायींच्या व्यवस्थापनासाठी गोठ्यात कायमस्वरूपी दोन मजूर आहेत. दररोज त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क असतो. शनिवार-रविवार शेतीवर जाऊन पुढील आठवड्याचे नियोजन करतो. माझी आई गावातच राहत असल्याने तिचे दैनंदिन व्यवस्थापनावर लक्ष असते.


मुक्त संचार गोठा ः
१) पाच गुंठे क्षेत्रावर मुक्त संचार गोठा. निम्म्या गोठ्यावर शेडनेटचे छत. गाभण गायीदुधाळ गायीवळू आणि वासरांसाठी स्वतंत्र कप्पे. गव्हाण आणि पाण्याची सोय.
२) दूध काढण्यासाठी फक्त बांधिव गोठ्यात गायी बांधल्या जातात. इतर वेळी मुक्त संचार गोठ्यात सोडल्या जातात.
३) बांधिव गोठ्याचा आकार ः २८ बाय ३३ फूट. सोळा गायी आणि वासरे बांधण्याची सोय.
४) योग्य उंचीची गव्हाण. गव्हाणीमध्ये २४ तास पाण्याची सोय.
५) जनावरे धुतलेले पाणीगोमूत्र स्वतंत्रपणे टाकीत जमा. शेणखतासाठी स्वतंत्र खड्डा.
६) मुक्त संचार गोठ्यामुळे गायींना पुरेसा व्यायामगरजेनुसार आहारपाणी मिळाल्यामुळे दुग्धोत्पादनात सातत्य.
७) गोठ्यात एक वळू. पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतन. पशुवैद्यकाकडून आरोग्य तपासणी आणि लसीकरण.
८) जातिवंत कालवडी तयार करण्यावर भर. सध्या १० ते १२ लिटर दूध देणाऱ्या गायी तयार होताहेत.


वर्षभर चारा नियोजन ः
१) तीन एकर क्षेत्रापैकी दोन एकरांवर संकरित नेपिअर आणि हंगामानुसार मकाकडवळ लागवड. गावातील दोन मित्रांशी तीन एकरांतून वर्षभर चारापुरवठ्याचा करार. या मित्रांना वर्षभरासाठी चाऱ्याचा दर बांधून दिला.
२) लोणी भापकर येथून वर्षभरासाठी दहा हजार कडबा पेंडीची एकदाच खरेदी.
३) एका गायीला ओलासुका चारा कुट्टी तीस किलो सकाळ- संध्याकाळ दिली जाते. शिफारशीनुसार खनिज मिश्रणाचा पुरवठात्यामुळे गायींचे आरोग्य चांगले.


मित्रांच्या सहकार्याने दुधाचे वाटप ः
दुग्धेत्पादनाबाबत आनंद उंडे म्हणालाकी सध्या ३० पैकी १२ गायी दुधात आहेत. एक गाय प्रति दिन वासरू पाजून सात लिटर दूध देते. रोजचे सरासरी ९० लिटर दूध गोळा होते. सकाळी चार वाजता आणि सायंकाळी पाच वाजता दूध काढले जाते. दुधाला ४.८ फॅटएसएनएफ ८.५ आहे. जवळील शेटफळ गढे गावातील मित्र अमोल कदमकडे १२ गीर गायी आहेत. त्याचे ४५ लिटर दूध जमा होते. संध्याकाळी काढलेले दूध एक आणि अर्धा लिटर पिशवी पॅक करून डीफ्रिजमध्ये ठेवले जातेतसेच सकाळी चार वाजता काढलेले दूध पिशवी पॅक करून डीफ्रिज केले जाते.
दूध वाटपाबाबत आनंद म्हणालाकी पणदरेमध्ये मित्राची डेअरी आहे. त्याची गाडी रोज पुण्यात येते. त्याच गाडीतून माझ्या दूध पिशव्या पुण्यात पहाटे पाच वाजता येतात. हडपसरबिबवेवाडीकोथरूडवारजेसिंहगड रोड परिसरात माझे दीडशे ग्राहक आहेत. दूध वितरणासाठी स्थानिक वितरकांशी मी जोडून घेतलेत्यांना कमिशन देतो. माझी पत्नी ललिता तसेच मित्र सचिन परदेशी आणि त्याची पत्नी स्वाती वितरणाचे नियोजन करतात. ग्राहकांशी संवाद साधतात. मी पुण्यात मे२०१५ पासून दुधाचे वितरण करीत आहे. सध्या दररोज १५० ग्राहकांना ७० रुपये दराने दुधाची विक्री होते. दरमहा दहा किलो तूप तयार करतो. ते १४०० रुपये किलो दराने विकतो. विभागानुसार ग्राहकांचे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत. ग्राहक माझ्या बॅंक खात्यात दुधाचे बिल जमा करतात किंवा चेक देतात. मी पुणे परिसरातील देशी गायींचे संगोपन करणाऱ्या पशुपालकांचा गट तयार केला. यासाठी मित्र सचिन परदेशी यांची मदत होते. गटामध्ये चर्चा होते. फेसबुकव्हॉट्सॲपमाहिती पत्रकांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत दुधाची माहिती पोचविली जाते.


सौरभेयी ब्रॅंडने विक्री ः
बाजारपेठेत वेगळेपण जपण्यासाठी आनंदने सौरभेयी ब्रॅंड तयार केला. नंदिनी डेअरी फार्म नावाने व्यावसायिक नोंदणी केली. दूध पॅकिंगसाठी अन्न आणि प्रशासन विभागाच्या मानांकनाप्रमाणे निकष पूर्ण करून प्रमाणपत्र घेतले. प्रयोगशाळेतून दुधाची तपासणी केली. पिशवीवर दुधातील घटक छापले. आनंद दर शनिवाररविवार ग्राहकांना शेतीगोठ्यावर नेऊन व्यवस्थापन दाखवितोत्यामुळे ग्राहकांना दुधाबाबत खात्री तयार झाली.
उत्पन्नाबाबत आनंद म्हणालाकी मित्रांच्या सहकार्याने हा व्यवसाय वाढवीत आहे. एका गायीचे रोजचे व्यवस्थापन आणि दूध वाहतूकवितरकाचे कमिशन हा खर्च वगळता दूध विक्रीतून सरासरी १५० रुपये उरतात. घरचा हिरवा चारा असल्याने अतिरिक्त खर्च नाही. मिळणारा नफा मी शेती आणि पशुपालनात गुंतवितो. परिसरातील शेतकऱ्यांना शेणखत आणि गोमूत्र विक्रीतून वर्षाला अडीच लाख रुपये मिळतात. त्यातून मजुरांचा पगारगोठा व्यवस्थापनाचा खर्च निघतो. सध्या दूधशेणगोमूत्र आणि कालवड हे उत्पन्नाचे स्रोत आहेत. आयुर्वेदिक कंपनीच्या मदतीने धूप कांडीगोमूत्र अर्कसाबणफिनेलउदबत्तीशाम्पूनिर्मितीचे नियोजन आहे.


जमिनीची सुपीकता वाढली... 
शेतीबाबत आनंद म्हणालाकी एक एकरावर फुले २६५ उसाच्या जातीची लागवड आणि दोन एकरांवर चारापिकांची लागवड आहे. विहिरीमुळे शाश्वत पाणीपुरवठा आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने पीक व्यवस्थापनात बदल करतो. शेणखताचा वापर आणि पाचटाचे आच्छादन असते. पिकांना माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन तसेच पाट पाण्यातून शेणगोमूत्राची स्लरी देतो. एकरी ५८ टनांवरून ७४ टनांवर गेलो. बांधावर ४५ नारळाच्या झाडांची लागवड आहे. येत्या चार वर्षांत शहाळ्याचे उत्पन्न सुरू होईल.


संपर्क : आनंद उंडे  : ९८२२६२६८३४                  

---*---

पशुसंवर्धनातून आर्थिक स्थैर्याकडे..

कालांतराने एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिकीकरणाने पशुसंवर्धनास एक नवी दिशा मिळाली.

लोकसत्ता टीम | May 26, 2016 4:21 AM
  62  0 Google +0  65

डॉ. पंकज भानुदास हासे/ डॉ. मंजूषा पंकज हासे
एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिकीकरणाने पशुसंवर्धनास एक नवी दिशा मिळाली. स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने पशुसंवर्धन व्यवसाय अल्पावधीतच उदयास आला. सन २००८२००९ मध्ये एकूण कृषी क्षेत्राच्या उत्पन्नामध्ये पशुसंवर्धनाचा वाटा २६.८४ टक्के आहे.
शेतीप्रधान संस्कृती असणाऱ्या भारत देशाला उत्तम पशुसंवर्धनाचा इतिहास व वारसा अगदी आर्य संस्कृतीपासून लाभलेला आपणास पाहावयास मिळतो. शेतीला पूरक साधन तसेच गाईला देवता मानणाऱ्या समाजामुळे पशुसंवर्धनाला आर्य समाजापासूनच महत्त्व होते. गाईच्या दुधामधील आयुर्वेदीय गुणधर्माचा अभ्यास आर्यकालीन भारतातसुद्धा प्रगत होता. उच्च पोषणमूल्य असणाऱ्या देशी गाईच्या दुधामुळे पशुपालन व्यवसाय वृद्धिंगत झाला. साधारणत: १८ व्या शतकाच्या पूर्वार्धापासून पशुपालनाकडे एक आर्थिक उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहिले जाऊ लागले. गोपालनाला राजाश्रय मिळाल्याने राजे-महाराजे आपल्या प्रजेला गोपालनासाठी प्रोत्साहित करू लागले. संपत्तीची देवाणघेवाण ही पशूंच्या स्वरूपात होऊ लागली. दैनंदिन जीवनातील आदान-प्रदानाचे माध्यम म्हणून पशूंचा विचार होऊ लागला. ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू म्हणून पशुसंवर्धनाकडे डोळसपणे पाहिले जाऊ लागले.
कालांतराने एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिकीकरणाने पशुसंवर्धनास एक नवी दिशा मिळाली. स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने पशुसंवर्धन व्यवसाय अल्पावधीतच उदयास आला. सन २००८-२००९ मध्ये एकूण कृषी क्षेत्राच्या उत्पन्नामध्ये पशुसंवर्धनाचा वाटा २६.८४ टक्के राहिला. पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असणाऱ्या परावलंबी शेतीला पर्याय म्हणून शाश्वत आर्थिक प्रगतीचा व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायाची भरभराट झाली. सकल घरेलू उत्पादनात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसायाने ५.९ टक्के वाढीची नोंद केली. गुजरात, महाराष्ट्र व पंजाब यांसारख्या राज्यांनी एकंदरीतच पशुसंवर्धनातून प्रगतीचा आदर्श संपूर्ण देशासमोर ठेवला.
गुजरातमध्ये सहकार रचनेतून निर्माण झालेली आनंद मिल्क युनियन हे बदलत्या आर्थिक प्रवाहाचे द्योतक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, पुणे यांसारख्या जिल्ह्य़ांनी तर पशुसंवर्धनामध्ये विविध प्रयोग करून शेती विकासाचा जणू कानमंत्रच दिला. तेथील अल्पभूधारक, शेतमजूर यांना दुभती जनावरे पोटच्या लेकरासमान वाटू लागली. चितळेसारख्या विज्ञानाची कास धरणाऱ्या संस्थेने आज परिसरातील अनेक कुशल व अर्धकुशल कामगारांना रोजंदार उपलब्ध करून दिलाच, शिवाय उत्पादित दुधाला खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध करून दिली. प्रभात, चितळे, पराग डेअरी, थोरात डेअरी, गोकुळ या व यांसारख्या अनेक दुग्ध उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या संस्थांनी शाश्वत अर्थार्जनाचा विश्वास पशुपालकांमध्ये निर्माण केला आहे. या संस्थांची कामगिरी होतकरू तरुणांना मार्गदर्शक ठरत आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेतील उत्पादन स्रोतांमध्ये एकंदर दुग्धोत्पादनाच्या ९२ टक्के, मांस उत्पादनाच्या ४२ टक्के व कातडी उद्योगाच्या ८३ टक्के उत्पादन हे गोधनापासून मिळते. १९५० ते १९७० या कालखंडामध्ये भारतातील दुग्ध उत्पादन गोठीत स्वरूपात होते. परंतु १९७० साली ऑपरेशन फ्लडच्या माध्यमातून धवलक्रांतीची मुहूर्तमेढ डॉ. वर्गीस कुरियन यांच्याकडून केली गेली. दुग्ध व्यवसायातील मैलाचा दगड म्हणून या उपक्रमाची इतिहासात नोंद झाली. जागतिक बँकेने १९९८ साली प्रकाशित केलेल्या आपल्या अहवालामध्ये या उपक्रमाचा विशेषत्वाने उल्लेख केला.
जागतिक बँकेने गुंतवलेल्या २०० कोटी रुपयांमधून प्रतिवर्षी त्यांना २४,००० कोटी रुपयांचा ग्रामीण अर्थकारणातून परतावा मिळाला आहे. जो की आतापर्यंत राबविण्यात आलेल्या कोणत्याही उपक्रमातून मिळाला नव्हता. डॉ. वर्गीस कुरियन यांनी अट्टहासाने कोटय़धीश होण्याचा मार्ग नाकारला आणि आणंदसारख्या धूळभरल्या खेडय़ाला आपली कर्मभूमी मानली. विदेशी आक्रमणाला थोपवत अमूलची निर्मिती केली व धवलक्रांतीच्या या जनकाने पशुपालक व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्याचा मार्ग दाखविला. २००१ मध्ये दुग्धउत्पादन ४८.६ दशलक्ष टनांवर पोहोचले. दूध उत्पादनाचा वार्षिक सरासरी दर हा ५.६ टक्के इतका राहिला आहे. १२ व्या प्रकल्पात महिला पशुउत्पादक संघटना स्थापन करण्याची गरज असल्याचे प्रकर्षांने उल्लेखिलेली आहे.
गोधन ज्याच्या घरी तेथे लक्ष्मी वास करी’, ‘ज्याच्या दारी काळी, त्याच्याकडे दररोज दिवाळी यांसारख्या पुरातन म्हणींची साक्षात प्रचीती गोपालकांनी अनुभवली. पशुसंवर्धनामुळे गोबर गॅस निर्मिती म्हणजे आजच्या वाढत्या महागाईच्या काळात इंधनाला स्वस्त आणि सुलभ उपाय पशुपालकांनी अवलंबिला आहे. करमाळा तालुक्यातील सुरेश वाघधरे यांच्यासारख्या प्रयत्नशील शेतकऱ्याने गोबर गॅसपासून (मिथेन) वीज निर्मिती, गांडूळ खत, व्हर्मीवॉश निर्मिती, नॅपेड खत निर्मिती असे प्रयोग करून पशुपालकांना अर्थार्जनाचा नवीन मार्ग दाखविला आहे.
इंडिया टुडेसारख्या नामांकित नियतकालिकानेही व्यवसायाभिमुख उद्योगांमध्ये शेळीपालन आर्थिक समृद्धी यासारख्या लेखाने शेळीपालन हा एक आर्थिक स्थैर्य देणारा व्यवसाय असल्याचे अधोरेखित केले. केवळ शेळीपालनावरच गुजराण करणारी कुटुंबे आपल्याला दिसतात. काळे सोने म्हणून ओळखले जाणाऱ्या उस्मानाबादी शेळीला राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या पारितोषिकाने शेळीपालकांचा विश्वास दृढ झाला आहे. या जातीच्या शेळीच्या एका वेळी तीन करडे जन्म देण्याच्या सिद्ध, जनुकीय गुणधर्मामुळे शेतमजूर, अल्पभूधारक यांना शाश्वत उत्पन्नाचे व अर्थार्जनाचे साधन उपलब्ध झाले आहे.
---*---

इथे जपली जातेय देशी वाणांची जैवविविधता
Wednesday, June 15, 2016 AT 05:45 AM (IST)
भिल्ली (जि. अमरावती) येथील रमेश साखरकर रुजवत आहेत आदर्श देशी बीजग्रामची कल्पना 
नया नौ दिन पुराना सौ दिन’ या वडिलांकडून मिळालेल्या विचाराचा वारसा जपत भिल्ली (ता. धामणगाव रेल्वेजि. अमरावती) येथील रमेश साखरकर यांनी पारंपरिक देशी वाणांच्या संवर्धनाचं काम चालविलं आहे. त्यांच्या देशी वाण संग्रहात तब्बल २५५ प्रकारचे देशी वाण असूनया लोकचळवळीमध्ये आजूबाजूच्या तीन जिल्ह्यांतील ४० शेतकरीही जोडले गेले आहेत. 
विनोद इंगोले 
भिल्ली (ता. धामणगाव रेल्वेजि. अमरावती) येथील रमेश साखरकर यांच्याकडं वडिलोपार्जित ३ एकर शेती आहे. त्यांचे वडील राजाराम हे पारंपरिक पद्धतीने धानमूगउडीदकपाशीगहूमिरची यांसारखी पिकं घेत. राजाराम यांच्या चार मुलांपैकी रमेश हे सर्वांत धाकटे. अगदी चौथीपासून वडिलांबरोबर शेतीमध्ये काम करू लागले. घरची आर्थिक स्थिती बेताचीच असल्यानं त्यांचं शिक्षण खुंटलं. साधारपणपणे १९७३-७४ पासून रमेश खऱ्या अर्थानं शेतीत उतरलेते आपल्या आई- वडिलांचे विचार घेऊनच. 
आई चंद्रभागा या आपले शहाणपणाचे बोल त्यांना ऐकवत.
दाटदूट बोनातो घर मे सोना
पतलं पतलं बोनातो सालभर रोना
किंवा पेर साधेलतर मळणी साधेल’ 

या पारंपरिक विचारसरणीचं बियाणं त्यांच्या मनात खोलवर रुजत गेलं. त्यांचे वडीलही शेत आपलंतर बियाणंही आपलंच हवं’ या विचारानं काम करणारे. त्या वेळी बाजारात कपाशीचं एक संकरित बियाणं आलं होतं. सारं गाव त्यामागे गेलं. प्रथम लोकांची उत्पादकताही वाढली. मात्रपुढे खर्च वाढत गेला आणि उत्पादकताही घटत गेली. वडिलांनी जपलेले ज्वारीगहूदेवऱ्या मिरचीगजरा तूरकाशी टोमॅटोहिवाई भेंडीगवारआंबडचुकाधने यांचे देशी वाण रमेश यांनीही जपले. पुढे गावोगाव फिरून त्यांत भर घातली. आज त्यांच्याकडं २५५ प्रकारचे देशी वाण आहेत. सुरवातीला स्थानिक लोक त्यांना विविध टोमणे मारत. आला रे गावरान’ अशी चेष्टा करीत. मात्रविचार पक्के असल्यानं हाती घेतलेल्या कामापासून ते दूर गेले नाहीत.
सेंद्रिय पद्धतीने देशी वाणांचं उत्पादन - 
स्वतःच्या तीन एकरपैकी दोन एकरांमध्ये प्रामुख्याने तूरमूगउडीद आणि कपाशी यांची लागवड करतात. त्यांच्याकडं सात ते ९ प्रकारच्या देशी तूरकपाशीच्या चारतर रब्बीमध्ये हरभऱ्याच्या चारगव्हाच्या पाच ते नऊ देशी वाणांची पेरणी केली जाते. साधारणपणे ऑगस्ट ते मार्च या काळात वांगी ९ प्रकारमिरची ५ प्रकारटोमॅटो ४ प्रकार यासोबतच पालकमेथीचाकवतकांदाकोबीचवळीभेंडी यांची सेंद्रिय व साखळी पद्धतीने लागवड केली जाते. त्यांच्याकडे सिंचनासाठी विहीर आहे. या भाज्यांच्या विक्रीसाठी सकाळी सात ते नऊ या काळात धामणगाव रेल्वे येथे विषमुक्त भाजीपाला विक्री केंद्र असा स्टॉल लावतात. आता त्यांचे ग्राहकही ठरलेले आहेतत्यामुळे दरही चांगले मिळतात. 

सेंद्रिय पद्धतीने उत्पादन - तूर एकरी ५ ते ७ क्विंटलउडीद मुगाचे २ ते ३ क्विंटलकपाशी पाच ते सहा क्विंटल मिळते. रब्बीमध्ये गहू एकरी १० ते १२ क्विंटलतर हरभरा सहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं. या उत्पन्नातून पत्नीमुलगी व नातू यांचा समावेश असलेल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होतो.

बियाणे बॅंक होतेय लोकचळवळ - 
रमेश साखरकर यांच्याकडे डाळवर्गीयकडधान्यभाजीपालावर्गीयकंदवर्गीयफळवर्गीयवेलवर्गीयतसेच चारावर्गीय देशी वाणांचे बियाणे जमवलेले आहे. लोकांना या बॅंकेची माहिती व्हावीया उद्देशाने दरवर्षी १५ मे आणि २ ऑक्टोबर या वेळी अनुक्रमे खरीप व रब्बीसाठी बीज महोत्सव भरवतात. त्याचप्रमाणे २५ डिसेंबरला पीक पाहणी मेळावाही भरवितात. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतामध्ये देशी वाणांची वाढ व इतर गुणवैशिष्ट्ये अनुभवता येतात.
बीज महोत्सवात शेतकऱ्यांना थोडेथोडे बियाणे वितरित केले जाते. त्यांना एकदा दिलेले बियाणे वारंवार वापरता येते. या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत देशी वाण पोचविण्याचा उद्देश साध्य होतोअसं रमेश सांगतात.
अमरावतीवर्धावाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यातील देशी बियाणे उत्पादक चाळीस शेतकरीही या मोहिमेमध्ये जोडले गेले आहेत. ते दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एकत्र येऊनआपले अनुभव वाटतात. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय त्यांनी हा उपक्रम राबविला आहे.

पीक संरक्षणही होते पारंपरिक पद्धतीने... 
लागवडीपूर्वी वारुळाची मातीशेणगोमूत्ररस्त्याची माती याचा वापर करून देशी वाणांवर बियाणे प्रक्रिया होते.
देशी वाणांवरील कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी राखण्यासाठी सापळा पीक म्हणूनही कपाशीमध्ये एकरी २० ते २५ झेंडू७ ते ९ कृष्ण तुळशीची झाडे यासोबत बांधावर मक्याच्या ओळी लावल्या जातात. निसर्गाला समजून घेतलं तर दुसरं काहीच करावं लागत नाहीअसं ते सांगतात.
शेतकरी शेणखत आणून त्वरित शेतात पसरवतात. पावसाच्या पाण्यासोबत ते वाहून जातं. त्याऐवजी पाऊस आल्यानंतर शेणखत जमिनीत मिसळलं पाहिजेअसं त्यांचे मत आहे. ते स्वतः एक ट्रॉली शेणखतामध्ये एक बैलबंडी माती४ ते ५ किलो तुरीचा भुसा अथवा बेसन२ किलो भुईमुगाचं तेल१० किलो गूळ याचा वापर करून ते मुरवतात. त्याला ते अलौकिक खत’ असं म्हणतात. हे डी.ए.पी. या रासायनिक खताप्रमाणे कार्य करत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

तरीही उमेद कायम ! 
आदर्श बीजग्रामची संकल्पना रमेश साखरकर यांनी मांडली आहे. त्या गावाने देशी वाणांचा पुरवठा राज्याला करावा. त्यासोबतच त्या गावात देखील देशी वाणांचीच लागवड व्हावीअसे आदर्श बीजग्राम अंतर्गत त्यांना अपेक्षित आहे. यासाठी धडपड करीत असलेल्या या अवलियाला तब्बल दोनदा अर्धांगवायूचा झटका आला. त्यातून सावरत ते आपलं काम जोमाने करत आहेत. गिरोली (ता. धामणगाव रेल्वेजि. अमरावती) आणि सालफळी (ता. बाभूळगावजि. यवतमाळ) या गावांत त्यांचं काम सुरू आहे. जैवविविधता ही भविष्यासाठी मोठी गुरुकिल्ली ठरणार असूनत्या वेळी लोकांना भिल्लीची (त्यांचं गाव) आठवण आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ते म्हणतात, ‘जे दिल्लीत नाहीते तुम्हाला केवळ भिल्लीत मिळेल!

रमेश साखरकर९८९०४७८८५० 
---*---

फिनिक्‍स भरारी अभिजित डाके

Friday, January 01, 2016 AT 06:15 AM (IST)
Tags: agro special
उद्योग-व्यवसाय करताना तोंडावर आपटण्याचा अनुभव अनेकांना येतो. कुणी त्यात मोडून पडतो तर कुणी तेथून उठताना सोबत अनुभवांचं गाठोडं घेऊन उठतो. तेच पुढच्या वाटचालीत मार्गदर्शक ठरतंबळ वाढवतं. सांगली जिल्ह्यातील ओझर्डे (ता. वाळवा) गावच्या दिनकर भगवान पाटील या शेतमालप्रक्रिया उद्योजकानेही असाच अनुभव घेतला. खूप ठेचा लागल्यानाका-तोंडात पाणी जाईपर्यंत गटांगळ्या खाल्ल्यापण हार नाही मानली. त्या संघर्षातूनच सत्तर कोटींची वार्षिक उलाढाल असलेला उद्योग नेर्ले येथे साकारला आहे. नवउद्योजकांसाठी पाटील यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. 

भगवान पाटीलवाळवा तालुक्‍यातील ओझर्डे गावचे सामान्य शेतकरी. शेतीवर उदनिर्वाह कठीणम्हणून शेतीमाल खरेदी करून बाजारात विकायचा. दिनकर हा त्यांना मुलगा. शेतीत कसायचाशिकायचा. पदवीधर झाला. चार बुकं शिकलीत तर काही वेगळं करूनउद्योग-धंद्यात पडू या विचारानं पछाडलेला. त्यासाठी धाडस करण्याची तयारी ठेवणारा तरुण.या तरुणाचं आयुष्य तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या भाषणाने बदलून गेलं. शेतकरी तरुणांनी फळबागायतकडे वळावेअसा सल्ला पवारसाहेबांनी दिला होता. तो दिनकर यांनी उचलला. मार्ग ठरलापाऊल उचलायचं पक्क झालं... पण ! हा पण फार मोठा होता. ना कोणता अनुभवना पैशांचे मोठे पाठबळ. कुटुंबीयांशी चर्चा केली. कुणाचा नकार नव्हतामात्र नेमके काय करायचेय हे दिनकर यांनाच माहीत नव्हते.

दिनकर यांनी कानोसा घेतला. फळप्रक्रिया उद्योग सुरू करण्याची संकल्पना अभ्यासली. तो उद्योग सुरू करण्याचं ठरलं. बॅंकांत प्रस्ताव द्यायचा तर आधी नाव हवं. "आदिती फूड्‌स प्रायव्हेट लि.नाव ठरलं. नेर्ले गावात जागा ठरली. आता विषय होताकोणत्या फळावर प्रक्रिया करावीलिंबूवर शिक्कामोर्तब झाले. अधिक काळ हंगाम आणि दीर्घकाळ टिकाऊपणाहे लिंबाचे अंगभूत गुण त्याला कारणीभूत होते. जागामशिनरीपरवाना घेण्यासाठी अडथळे आले. दिनकर घाबरले नाहीत. अडचणींवर मात केली. जिद्दीनं कर्ज उभारलं. नाबार्डजिल्हा बॅंकेचे पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. कर्ज मंजूर झालं. दोन कोटींचे पहिले कर्ज घेतले. सल्लागार घेतले. सन 1994 मध्ये "आदिती फूड्‌स'ची उभारणी झाली. लिंबूवर प्रक्रिया सुरू केली. बाजारपेठ शोधताना अडचणी आल्या. तरी सुद्धा राज्यात आणि शेजारील राज्यात बऱ्यापैकी बाजारपेठ मिळू लागली.

गावाबाहेर पडून जगाचा अनुभव घेतला. मार्केटचं ज्ञान मिळवलं. जम बसतोयअसं वाटत असतानाच संकटाची मालिका सुरू झाली. लिंबू मिळेना झाले. कधी दर अवास्तव झाला. आर्थिक गणितं चुकू लागली. लिंबूवर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प 1997 पर्यंत चालवला. या चार वर्षांत चार कोटींचा घाटा झाला. परिस्थिती अंत पाहत होती. बॅंकेचं कर्ज थकलंकरणार कायधंदा नव्याने उभा करणं सोप्प असतं कादिनकर पाटील हतबल झाले होते. पुन्हा बॅंकेच्या वाऱ्या सुरू केल्याबॅंकांनी पुन्हा कर्ज दिलं. नवीन उमेदीनं कंपनी सुरु झाली. आता चुकांतून मिळालेला अनुभव गाठीशी होता. आता पडायचं नाहीलढायचं हा निर्धार पक्का होता. 1998 मध्ये आंबा या फळावर प्रक्रिया करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी दोन कोटीचं नवं कर्ज घेतलं. आबां खरेदीसाठी कोकण दौरा केला. कोकणात बरचं भटकंती करावी लागली. आंबे मिळवले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून नकारही आला. तरीसुद्धा ते मागे हटले नाहीत. नवीन यंत्रसामग्री आणली. नवी बाजारपेठ शोधली. मॅंगो पल्पचे उत्पादन सुरू झाले. त्याला बाजारपेठेसाठी खूप प्रयास केला. गावोगावी स्टॉल लावले. प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला. रेडिओ आणि वर्तमानपत्रांत जाहिराती दिल्या. राज्यात बऱ्यापैकी मार्केट मिळालं.

याच दरम्यानइराकइराणमध्ये दौरा करण्याचा योग आला. धाडस केलं. सन 2002-03 मध्ये दोन्ही देशांतून 70 कंटेरनची म्हणजे तब्बल दीड हजार टनाची ऑर्डर मिळाली. दिनकर यांच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण होता. रात्रीचा दिवस केला. ऑर्डर पूर्ण केली. पण.... हा पणपुन्हा-पुन्हा आडवा येत होता. काहीतरी उभं राहतंयअसं वाटत असताना पत्त्याचा बंगला कोसळावा तसा सारं होत्याचं नव्हतं करत होता. इराक-इराणमध्ये युद्ध सुरू झालं होतं. तिकडे बॉंब बरसत होते अन्‌ इथे दिनकर यांचा धंदा उद्‌ध्वस्त व्हायची वेळ आली होती. ती मॅंगो पल्पची ऑर्डर परत आली. 1500 टन मॅंगो पल्प राज्यातील बाजारात विकणे शक्‍य होते काधंदा बुडणार हे पक्क होतं. तब्बल 4 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला. आता इतकं बुडाल्यावर कुणीतरी कमजोर मनाचा माणूस मोडून पडला असता. दिनकर मात्र खचले नाही. पुन्हा कर्ज काढण्याचा निर्णय घेतला. 12 कोटींचं कर्ज घेतलं. तारण द्यायला तेवढी सामग्री होती. पण नुकसान भरणारं नव्हतं. बहुतांश कर्जं थकीत झालीवाढू लागली. दोन वर्षांत वाढलेला आलेख झटक्‍यात कोसळून मातीला मिळाला होता. 40 कोटी रुपयांचं कर्ज झालं. जुलै 2006 ला बॅंकेनं सिक्‍युरिटायझेशन ऍक्‍ट खाली कंपनी ताब्यात घेतली. पायाखालची जमीन सरकली. ते सुन्न झाले. देणं जास्त. करायचे काय?

बॅंकांशी चर्चा करण्यासाठी वाऱ्या सुरू झाल्या. बॅंका म्हणणं ऐकून घेईनात. शेवटी बॅंकेने कंपनीचा लिलाव करण्याचे ठरविले. लिलावाचा दिवस आला. बोली लागू लागल्या. चार कोटींवर कोणी बोली लावली नाही. कर्ज मुद्दल व व्याज मिळून 40 कोटी द्यायचे होते. यामुळे बॅंकेचे कर्ज फिटू शकणार नसल्याचे अधिकाऱ्यांना कळाले. बॅंकेने काही अटी व शर्तीवर कंपनी पुन्हा दिनकर पाटलांच्या ताब्यात दिली. त्यासाठी एक कोटी रुपये बॅंकेत भरावे लागणार होते. पुन्हा एकदा पैशांची जमवाजमव सुरू झाली. काही शेतकरीपै-पाहुणेमित्रांकडून पैसे घेतले. कंपनी ताब्यात घेतली. बॅंकेचा अधिकारी कंपनीत हजर झाला. अधिकाऱ्यांच्या पाहणीखाली कंपनी सुरू झाली. कंपनीत तयार होणारा माला तारण ठेवून कंपनीला कर्ज देण्याचे बॅंकने ठरवले. कंपनी पूर्वपदावर येण्यासाठी वर्षभराचा कालावधी गेला. पुन्हा 2008 ला बॅंकने कर्ज दिले.

दिनकर यांचा मुलगा भगतसिंह कंपनीत दाखल झाला. तो एम.बी.ए. झालाय. भगतसिंहने मार्केटिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. तो परदेशी जातोमार्केट शोधतो. 2010 मध्ये परदेशी अन्न व प्रशासनची प्रमाणपत्र घेतली. आशियाआफ्रिकाऑस्ट्रेलियायुरोप अमेरिका देशात बाजारपेठ मिळाली. "आदिती'ची मॅंगो पल्पजामटुटीफ्रुटीटोमॅटो केचअपचायनीज सॉसस्वीट कॉर्नपपई पल्पमकाटोमॅटो प्युरीमॅंगो कॅंडी यासह 65 उत्पादने जगभरातील बाजारात पोचली. कष्टाचं फळ मिळालं. बॅंकेचे कर्ज हळूहळू कमी केलं. 2013 ला दुसरा मुलगा पृथ्वीराज एम.बी.ए. पूर्ण करून व्यवसायात आला. त्यानं भारतीय बाजारपेठयोग्य फळांची खरेदी आदी गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. कंपनीची आज वार्षिक सत्तर कोटीहून अधिक उलाढाल असून 600 कामगार आहेत. कंपनीने फिनिक्‍स भरारी घेतली आहे.

दिनकर भगवान पाटील,
आदिती फूड्‌स (इंडिया) प्रा. लि,
9665824444
9822098660 
---*---

७० गायींचा आदर्श गोठा सांभाळणारे डोके दांपत्य

Monday, February 22, 2016 AT 05:45 AM (IST)
Tags: agro special
दुष्काळी परिस्थितीदुधाचे घटलेले दरमजुरांची गंभीर समस्यावाढलेला उत्पादन खर्च या बाबी लक्षात घेता दुग्ध व्यवसाय करणे व तो शाश्वतदृष्ट्या सुरू ठेवणे जिकिरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत पुणे जिल्ह्यातील बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील रोहिदास व अर्चना या डोके दांपत्याने तब्बल ७० गायींचा सांभाळ करून हा व्यवसाय शाश्वत केला आहे. 

डोके दांपत्याच्या दुग्धव्यवसायाची वैशिष्ट्ये - 
अतीव कष्टअभ्यासकुटुंबातील एकी आणि सातत्य या गुणांच्या जोरावर दोन गाईंपासून सुरू व्यवसाय आजमितीला सुमारे ७० गाईंपर्यंत वाढवला.
यात बहुतांश (४८) होल्स्टिन फ्रिजियन (एचएफ) तर अन्य जर्सी व गीर गायी आहेत. दोन बैल आहेत. देशी गाईंचे दूध घरी वापरासाठी आणि गोमूत्राचा औषध म्हणून उपयोग होतो.
जनावरांची लहान मुलांसारखी काळजी घेतली जाते. खाद्य टाकायचे आणि गायी सोडून द्यायच्या असं होत नाही. प्रत्येक जनावराला गरजेनुसार पुरेसा आहार दिला जातो.
सकाळपासून रात्रीपर्यंत व्यवसायात खंड नाही. डोके दांपत्याचा दिनक्रम पहाटे पाच वाजता सुरू होतो. दुपारपर्यंत गोठ्यातील कामे झाल्यानंतर दुपारी शेतातील कामे सुरू होतात. सायंकाळी पुन्हा दूध काढणेखाद्यपाणीदूध विक्रीस घेऊन जाणे अशी कामे केली जातात.

दुग्धव्यवसायातील महत्त्वाच्या बाबी 
२०१२ पासून मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब.
प्रत्येक गाईचे वैद्यकीय रेकॉर्ड’ ठेवले.
घरच्या १० एकरांत हत्ती गवतकडवळ व ऊस लागवड
प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करण्यावर कटाक्षखाद्याकडे विशेष लक्ष.
कोणत्याही शासकीय योजनेची मदत न घेता ही कामगिरी. त्यांचे अनुकरण परिसरातील अनेक शेतकरी करत आहेत.
व्यावसायिक दुग्धपालनासाठी सगळीच जनावरं कमावती हवीत. मात्रसद्यस्थितीत गाईंच्या किंमती लाखांच्या घरात गेल्या आहेत. त्यामुळे दर वर्षी नवीन गाई घेण्याऐवजी गोठ्यातच पैदास करण्यावर भर
दुग्ध व्यवसायातील उत्पन्नातून जमिनीचे सपाटीकरणसुपिकीकरणबांधबंदिस्तीपाण्यासाठी चार विहिरीपाइपलाइन या बाबी केल्या आहेत
शुन्यातून सुरवात करून कोणत्याही शासकीय योजनेची मदत न घेता डोके यांनी प्रगती साधली आहे.

४० वर्षांत एकही खाडा नाही 
आळे येथील सहकारी संस्थेला डोके गेली चाळीस वर्षे दूध पुरवीत आहेत. आजपर्यंत त्यात एकही दिवस खाडा झालेला नाहीअसे ते अभिमानाने सांगतात.

गरजेच्या पैशांसाठी आर्थिक फंड दुग्धव्यवसायात पैशांची सतत गरज भासते. अशावेळी वेळेला पैसा हाताशी असावा यादृष्टीने रोहिदास व दुग्धव्यवसायातील त्यांचे सहकारीमित्रमंडळी यांनी एकत्र येऊन २००३ मध्ये पहिला आर्थिक फंड सुरू केला. सुमारे ३० जण सभासद असलेल्या या फंडात दरमहा शंभर रुपये शेअर संकलित केला जातो. जमा पैसे सभासदांना एक टक्का व्याजदराने दिले जातात. रोहिदास यांना
गायींची टप्प्याटप्प्याने खरेदी करणे यामुळेच शक्य झाले.

दुग्धव्‍यवसायाचे अर्थकारण 
दररोजचे दूधउत्पादन - सुमारे ४५० ते ४७५ लिटर (३.७ ते ३.८ फॅट व एसएनएफ ८.५ पर्यंत)
दररोजच्या दूधसंकलनाची वर्षाची सरासरी- ४३५ लिटर
गेल्या वर्षीचे एकूण दूध उत्पादन (२०१५) - सुमारे एक लाख ७५ हजार लिटर
सध्या डोक्यावर कसलेही कर्ज नाही. त्यामुळे अर्थकारणात त्याचा घाटा नाही.
अतिरिक्त उत्पन्न : शेणखत : वर्षाला सुमारे ६० ट्रॅक्टर ट्रॉलीत्यापासूनचे उत्पन्न - सुमारे दोन लाख रुपये.
सुमारे ७० जनावरे व शेती ही सर्व जबाबदारी डोके दांपत्याने दोन मुलांसह समर्थ पेलली आहे.
एकही मजूर न ठेवता केवळ कुटुंबाच्या एकोप्यातून मजुरांवरील संपूर्ण खर्चात बचत केली आहे. दुग्धव्यवसायात नफ्याचे मार्जिन घटले असले तरी स्थिरता गाठली आहे. 
---*---

No comments:

Post a Comment