Sunday, 12 February 2017

प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा....भाग-7 (ॲग्रोवन व इतर वृत्तपत्र तसेच वेबसाईट्सद्वारे संकलित)

जीवामृत एक चमत्कारी विरजण- बुधवार२८ जानेवारी२०१५

जीवामृत एक चमत्कारी विरजण झिरो बजेट नॅचरल फार्मिंगचा जणू जीवच आहे. त्यांच्या या कृषी पद्धतीतीचे जे चार आधार स्तंभ सांगितले आहेत,त्यात बीजामृत,जीवामृत,आच्छादन आणि वापसा यांचा समावेश होतो. शून्य खर्चाची शेती करयची असेल तर शेतकर्यांकडे एक देशी गाय असणे गरजेचे आहे.एका गाईच्याशेण- गोमुत्राचा वापर करून 30 एकर शेती उत्तम प्रकारे करता येते.त्यासाठी मग कोणतेही रासायनिक खत ,जीवाणू खत,सेंद्रिय खत म्हणजेच शेताच्या बांधावर तयार होणारे कंपोस्ट,नॅडेपखत ,किंवा अनुदान घेऊन शेतातच तयार केलेले गांडूळ खत वापरायची अजिबात आवश्यकता नाही. तरीही पिके उत्तम येतात पिकांचे उत्पादन .ऊसाचे टनेज आणि फळांचे उत्पन्नही भरपूर मिळते आणि सर्व फळे एकाच आकाराची येतात.पिकांवर कोणताही रोग पडत नाही .अर्थात त्यासाठी पेरणीच्या वेळी बिजामृत नंतर जीवामृतासोबत आच्छादन व वापसा तंत्रही समजून घेऊन ते वापरावेच लागते. देशी गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात असे मानले जाते ते असतात की नाही माहिती नाहीपण गाईच्या पोटात अनंत कोटी उपयुक्त जीवाणू असतातआणि या जिवाणूंना अनेक पटीत गुणाकार पद्धतीने वाढवण्याचे तंत्र पाळेकरांनी शोधून काढले आहे. हेच जीवाणू निकोप वाढीसाठी पिकांना झाडांना मदत करतात. मात्र विदेशी किंवा जर्सी गाईचे शेण गोमुत्र मात्र या साठी अजिबात चलणार नाही. जीवामृत नावचे विरजण ,अर्थात सुभाष पाळेकर संशोधित जीवामृत हे देशी गाईच्या शेण आणि गोमुत्र यांच्यापासून बनवायचे असते ते खत नसून विरजण आहे .पण त्याचे त्याचे सामर्थ्य एवढे आगाध आहे की ते वापरले की सर्व प्रकारच्या रासायनिक आणि सेंद्रिय खतांची शेतीतून सुट्टी होते. जीवामृत तयार करण्याची विधी ,त्याला लागणारा अवधी,आणि वापर कसा करावा याची माहिती या लेखमालेत क्रमश: घेणार आहोत .अर्थात हे सर्व ज्ञान माझे नसून कृषी ऋषी सुभाष पाळेकर यांच्या तपश्चर्येचे हे फळ आहे.त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात या जीवामृताबद्दल सविस्तर माहिती दिली जाते त्यांच्या पुणे येथील शिबिरात मीआणि मझ्या मुलाने घेतलेल्या माहितीच्या आधारावर आणि आमच्या शेतात विविध पिकांना जीवामृत वापरल्यामुळे आलेल्या अनुभवावर हे लिखाण आवलंबून आहे.याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. जीवामृत कसे तयार करतातयाची कृती बघण्यापूर्वी जीवामृत तयार करायला कोणते साहित्य लागते ते समजून घ्यावे लागेल. साहित्य: 200 लिटर पाणी ,5 ते 10 लिटर देशी गाईचे गोमुत्रज्यात देशी गाईचे गोमुत्र आणि 10 किलो देशीगाईचे शेणआणि गोमुत्र वापरताना , 50 टक्के गोमुत्र असणे आवश्यकच आहे. बाकी निम्मे बैलाचे किंवा म्हशीचे मुत्र घेतले तरी चलते मात्र कोणत्याही परिस्थितीत जर्सी गाईचे गोमुत्र चालणार नाहीकारण त्या प्राण्यात गाईची कोणतीच लक्षणे नाहीत. शेणाचे प्रमाणही गोमुत्रासारखेच लागेल.म्हणजे 5 किलो गाईचे शेण अनिवार्य 50 टक्के म्हणजे पाच किलो बैलाचे अथवा म्हशीचे कोणाही एकाचे वापरता येते. 1 किंवा 2 किलो डाळीचे पीठ ज्यात तूर ,मुग,हरभरा ,घेवडा,चवळी अश्या कोणत्याही कडधान्याचे चालते . फक्त सोयबीन आणि शेंगदाण्याचे पीठ चालत नाही कारण त्यांच्या तेल तवंगामुळे जीवामृतातील जीवाणूंची वाढ खुंटते. या शिवाय एक किलो काळा गूळ ,किंवा चार लिटर ऊसाचा रस ,किंवा 1 किलो कोणत्याही गोड फळाचा गर ज्यात पेरू ,पपई ,चिकू इ. आणि एक मुठभर बांधावरील जीवाणू माती.एवढे सारे साहित्य जीवामृत बनवायला लागते ज्यातील बहुतेक शेतकर्यांच्या शेतात तयार होणारे आहे.बाजारातून काहीही विकत आणायचे नाही.ही झिरो बजेट शेती करणार्‍या शेतकर्याची प्रतिज्ञा आहे. गोमुत्र संकलन कसे करावेजर गाईचे गोमुत्र मिळवायचे असेल तर पहाटे पाच वाजताच उठावे लागते आणि गाय रात्रभर विश्रांती घेऊन उठायच्या आत गोमुत्र धरायचे भांडे घेऊन घेऊन गाय बंधलेल्या ठिकाणी ते उठायच्या वेळी हजर राहावे लागते. हे करण्यासाठी काही गरीब होतकरू शेतमजुरांची मुले निवडता येतील. ज्यांच्या घरी गाय आहे अशा मुलांना जर आपण देशी गाईच्या गोमुत्राच्या संकलनाचे काम दिले तर ते मिळणार्‍या पैशाच्या आशेने पहाटे पाच वाजता उठून गोमुत्र संकलन करतील.त्यांना एक लिटर गोमुत्राच्या मोबदल्यात पांच ते दहा रुपये दिले तर ते पैसे त्यांच्या शिक्षणाच्या कामी येतील.यातून स्वार्थ आणि परमार्थ साधेल. पण झिरो बजेट शेती असल्याने गोमुत्र विकत घेण्यापेक्षा एक देशी गाय पाळली तर गोमुत्रासोबत दुध आणि गाईपासून बैल व गाई मिळवता येतील . एक गाय विकत घेऊन पाळली तर तिच्या गोमुत्र आणि शेणापासून 30 एकर शेतीसाठी वापरावे लागणारे जीवामृत वर्षभर तयार करता येते. आणि गोमुत्राच्या साह्याने तयार होणार्या जीवामृताचा वापर करून चारा लागवड केली तर 10 गुंठे चारा एका गाईल वर्षभर पुरतो. आपली शेती झिरो बजेट असल्याने गोमुत्र विकत घेणे परवडणार नाही .त्या ऐवजी देशी गाय पाळावी ती ज्या गोठ्यात बांधताततो गोठा साधारणत: 11.5फुट बाय 13 फुटाच्या जागेत बांधून घ्यावा ज्याच्या फरशीचा किंवा बेड चा उतार गाईच्या पायाकडील बाजुला काढून सर्व गोमुत्र नालीत एका बाजूला उताराकडे वाहत जाऊन ते एका हौदात जमा होईल अशी व्यव्यस्था करता येते. वरील सर्व साहित्य वापरून जीवामृत तयार करण्यासाठी एक प्लास्टिकचा 200 लिटरचा ड्रम किंवा मातीचा रांजणकिंवा लोखंडाचा ड्रम वापरता येतात .या पैकी कहीही विकत घ्यायचे नसेल तर सावलीत खड्डा करून त्याला त्याला दगडाने ठोकून गच्च करा आणि शेणाने लिंपून प्लास्टिकच्या अस्तराने झाकून त्यात पाणी टाकून जीवामृत करता येते.त्या साठे लागणारा पोहरा आपल्याकडे असेलेया कोणत्याही कीटकनाशकाचा डब्बा घेऊन त्याला समांतर दोन छिद्रे पडून त्यात एक लोखंडी ग्जालीचा तुकडा बसवून पोहरा करता येतो. धर्म उपलब्ध असेल तर तो उन व पावसाचे पाणी लागणार नाही अशा जागी सावलीत ठेऊन पाण्याने भरा. त्यात सर्वप्रथम हाताने शेण कालवून घ्यावे.त्यानंतर पाच ते दहा लिटर गोमुत्र मिसळावे ,एक किलो गुळ आणि एक किलो बेसन पीठ त्यात मिसळावे .गुळाऐवजी चार लिटर उसाचा रस किंवा एक किलो गोड फळाचा गर टाकून मिसळावा.अर्थात ही फळे शेतातच कायम मिळावी म्हणून अशा फळाचे एकेक झाड लावता येते किंवा बागवान सायंकाळी घरी परतत असताना ती पिकलेली फळे फेकून देतो त्याला सांगितले तर ही गोड अति पिकलेली फळे तुम्हाला फुकट देईल किंवा अत्यंत कमी पैशात ती घेता येतील कारण आपली झिरो बजेट शेती आहे.त्यामुळे महागडी फळे विकत घेऊन ती वापरायची नाहीत. शेतातील 10 किलो वजनाचे उसाचे धांडे बारीक तुकडे करून टाकता येतील.शेजारीही फुकट देईल गूळ देखील घाऊक विक्रेत्या दुकानदाराकडे गेलात तर कळा किंवा गुळाच्या विक्री नंतर उरलेले गुळाचे तुकडे अतिशय स्वस्तात मिळतात .नांदेडमध्ये इतवारा भागात अशी काही दुकाने आहेत त्यांच्याकडे हा न विकला जाणारा काळा गूळ 10 ते 15 रुपये किलोने मिळतो.जीवामृतात गूळ ,उसाचा रस ,उसाचे धांडे ,गोड फळाचा गर या पैकी फक्त एकच गोड पदार्थ वापरायचा आहे,.बांधावरील मुठभर जीवाणू माती (50 ग्राम) घेऊन या द्रावणात टाकावी व हे द्रावण आपल्या हाताने कालवून घ्यावे व एक लांबट लाकूड किंवा काठी घेऊन क्लाकवाईज अर्थात ब्रह्मांड गतीने ,विश्वगतीने म्हणजे पृथ्वी ज्या दिशेने डावी कडून उजवीकडे फिरते त्या दिशेने किंवा देवाला प्रदक्षिणा घालतात त्या दिशेने दोन मिनिट ढवळावे. गोणपाट झाकून ठेवावे ड्रमाचे तोंड इतके पक्के बांधून नका की त्यातून हवाच बाहेर पडणार नाही म्हणून सच्छिद्र गोणपाट बांधून तोंड बंद कारावे. या ड्रमावर उन्हे पावसाचे पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि सकाळ संध्याकाळ गोणपाट काढून लाकडाने दोन मिनिटे ढवळावे. 48 तास किण्वनक्रिया होण्यासाठी लागतात. त्यानंतर हे द्रावण जीवामृत बनते आणि वापरायला तयार होते. त्याची एक्सपायरी डेटते तयार झाल्यावर सात दिवसांनी येते .त्या आधीच ते वापरून टाकावे. आज कवी श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर असते तर ते या जीवमृताचे सामर्थ्य बघून म्हणाले असते. माझिया जीवामृताचिये बोलु कवतिके सर्व खतांच्या मात्रांशीही पैजा जिंके या नंतरच्या लेखात आपण जीवामृत कसे कार्य करते त्याचे फायदे पिकांना कसे मिळतात . प्रत्येक पिकला कितीआणि ते कसे वापरावे याची माहिती घेणार देणार आहे.
---*---

दुग्ध व्यवसायामुळे ‘लाेणी’ झाले समृद्ध
-
Thursday, December 15, 2016 AT 06:30 AM (IST)
Tags: agro special
गावातील प्रत्येकाच्या घरीदारी दुधाळ जनावरे 
--
लाेणी गावाविषयी ठळक-- 
गावची लाेकसंख्या -४५०
जमीन- २५० एकर
दुधाळ जनावरे (म्हशी)- ४२५
दरराेज एकूण दूध संकलन- ३ ते साडेतीन हजार लिटर
दुधाला मिळणारा दर- (डेअरीला) ५० रुपये प्रति लिटर
घरपोच ६० रुपये.
अकोला जिल्ह्यातील लोणी गावाची सर्व जमीन काेरडवाहू. त्यातच भर म्हणजे खारपाणपट्ट्यातील हा परिसर. अशा परिस्थितीत येथील ग्रामस्थांनी पूरक व्यवसायाची कास धरून प्रगतीची वाट धरली. अाज गावातील प्रत्येकाच्या घरी दुधाळ जनावर बांधलेले दिसते. कधीकाळी माेलमजुरीसाठी दुसऱ्या गावाची वाट धरणाऱ्या येथील नागरिकांना अाता कामांसाठी मजूर मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे. सुमारे साडेचारशे लाेकसंख्या असलेल्या या चिमुकल्या गावातून दिवसाला किमान तीन ते साडेतीन हजार लिटर दुधाचे संकलन हाेते. अकाेला शहराची दुधाची गरज भागविण्याचे काम ‘लाेणी’ गाव करीत अाहे. 
गोपाल हागे 

लाेणी हे अकाेला शहरापासून अवघे पाच ते सहा किलाेमीटरवर असलेले गाव. गावाचा समावेश खारपाणपट्ट्यात असल्याने शेती असूनही सिंचनाला मर्यादा येतात. खरीप हंगामावरच गावचे अर्थकारण अवलंबून असते. चांगला पाऊस झाला तर काही शेतकरी रब्बीत हरभरागहू घेतात. या गावात दूध व्यवसायाला साधारणतः १९६० पासून पाठबळ मिळाले. लोणी ग्रामस्थ तेव्हाही दुधाचा व्यवसाय करीत. त्या वेळी वाहनांची उपलब्धता नव्हती. शिवाय पक्का रस्ता नसल्याने अनेक वर्षे गावकरी पायी अकाेला येथे जाऊन दूधवाटप करायचे. अनेक वर्षे असाच क्रम सुरू हाेता. त्यानंतर काही जण सायकलीद्वारे दूध नेऊ लागले. अाता एकाच घरात एक-दाेन दुचाकी अाल्या. त्याद्वारे दुधाचे कॅन सकाळ-संध्याकाळ अकाेल्यात नेले जातात. सध्या गावातून किमान तीन हजार लिटरपेक्षा अधिक दूध अकाेल्यात जात असल्याचे येथील ग्रामस्थ निळकंठ खेडकर यांनी सांगितले.

उपसभापतीही दुग्ध व्यवसायात सक्रिय 
वऱ्हाडातील सर्वांत माेठी उलाढाल असलेल्या अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून कार्यरत असलेले निळकंठ राजेंद्र खेडकर याच गावचे आहेत. सहकारात सक्रिय असलेल्या खेडकर यांनी दुग्ध व्यवसायातील सचाेटी मात्र साेडली नाही. अाजही सकाळी व सायंकाळी न चुकता अकाेला येथे सुमारे १०० लिटर दूध ते शहरात पाेचवितात.

अख्ख्या गावाला लागला व्यवसायाचा लळा 
एखादा व्यवसाय गावाचे अर्थकारण कसे बदलताे याचे अादर्श उदाहरण म्हणून ‘लाेणीकडे पाहिले जाते. अवघी साडेचारशे लाेकसंख्या व ७५ घरांच्या या गावात अार्थिक समृद्धी अाता भरभरून नांदते अाहे. कुठल्याही गल्लीत गेले तरी घरासमाेर कुठे म्हैसकुठे गायबकऱ्या दिसतील. अगदी भूमिहीनांच्या घरच्या गाेठ्यातदेखील जनावरे बघायला मिळतात. प्रत्येकाच्या उत्पन्नाचा स्राेत म्हणजे दुग्ध व्यवसायच झाला आहे. वडिलाेपार्जित चालविला जाणारा हा व्यवसाय अाताची पिढी तितक्याच ताकदीने पुढे नेत अाहे. नाना काळे नावाच्या तरुणाने अकाेला येथे डेअरी सुरू केली. स्वतःच्या घरच्या २०० ते २५० लिटर दुधाची विक्री तेथे केली जाते. म्हशींच्या खाद्यापासून अाराेग्यापर्यंत प्रत्येक गाेष्टीची काळजी घेतली जाते.

अडचणींवर उत्तरेही मिळवली-- 
दुधाळ जनावरे पाळताना चाऱ्याचा मुख्य प्रश्न असताे. या गावात तितकी पुरेशी जमीन नाही. त्यामुळे नागरिक साेयाबीनहरभऱ्याचे कुटारकडबा वर्षभर पुरेल इतका उपलब्ध करतात. कडबा २५०० ते ३००० रुपये प्रति शेकडा दराने घेतात. हरभऱ्याचे कुटार ३५० ते ४५० रुपये प्रति क्विंटल दराने बुलडाणा जिल्ह्यातून अाणले जाते. दुधाळ जनावरांसाठी बंदिस्त स्वरूपातील गाेठे घराेघरी बांधलेले अाहेत. प्रत्येक ठिकाणी पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात ठेवलेले असते. अकाेल्याला जाेडणारा रस्ता जागाेजागी उखडला अाहे. त्यावरून ये-जा करताना अडचणी येत अाहेत. रस्ता दुरुस्तीला मंजुरी मिळाली असून अागामी काळात ताे पूर्ण झाल्यावर दळणवळणाची साेय सुकर हाेईल.

पीक पद्धतीत बदल-- 
खारपाणपट्ट्यात शेतीला मर्यादा असून खरीप हंगामावरच शेतकऱ्यांची सारी भिस्त असते. गावात साेयाबीन हे प्रमुख पीक अाहे. शेणखताचा मुबलक वापर प्रत्येक शेतात केला जातो. सोयाबीनची सरासरी उत्पादकता एकरी अाठ क्विंटलपर्यंत अाहे. मागील दाेन वर्षांपासून शेतकरी तुरीच्या पिकाकडे वळले. काही जण रब्बीत हरभरागहू घेण्याचाही प्रयत्न करीत अाहेत. या गावाचा शेती हा दुय्यम व दुग्ध व्यवसाय प्रमुख बनला अाहे.

--
उद्याची पिढी शिकतेय-- 
दुग्ध व्यवसायाने गावात अार्थिक सुबत्ता अाली. तरुण पिढी ताकदीने व्यवसाय सांभाळते अाहे. अाताची नवी पिढी अकाेला महानगरात विविध मराठीइंग्लिश माध्यमाच्या शाळांमधून शिकते अाहे. घराघरातून मुला-मुलींच्या शिक्षणावर जाणीवपूर्वक जाेर दिला जात अाहे. शाळेसाठी गावातून दरराेज व्हॅन जाते. पुढच्या पिढीला शिक्षण देण्याचा चंग अाता लोणीतील ग्रामस्थांनी बांधला अाहे.

--'
अात्माचे बळ-- 
लाेणी गावात कृषी विभागाच्या ‘अात्मा’ यंत्रणेच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय अाधारित प्रक्रिया व स्वच्छ दुग्धनिर्मिती विषयावर प्रशिक्षण देण्यात अाले आहे. गावात या यंत्रणेमार्फत तीन महिला व पुरुष शेतकरी नाेंदणीकृत गट स्थापन झाले अाहेत. त्यामार्फत प्रक्रिया व्यवसाय सुरू करण्यावर भर दिला जाणार अाहे.
--
संपर्क- निळकंठराव खेडकर९७६३७११८२८ 
---*---

ग्रामविकासासाठी एनजीओसीएसआरचा वापर प्रभावीपणे करा - पोपटराव पवार
Thursday, December 15, 2016 AT 05:45 AM (IST)
Tags: agro special
पुणे - राज्याच्या ग्रामविकासात चांगल्या अशासकीय संस्थांच्या (एनजीओ) सहभागाचे स्वागत करून उद्योग जगतातील सामाजिक दायित्व निधीचा (सीएसआर फंड) वापर वाढवायला हवा. त्यासाठी गावांनी ताठर भूमिका सोडून सहकार्य करण्याची आवश्यकता आहेअसे स्पष्ट मत राज्य शासनाच्या आदर्श गाव योजना संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

गावांच्या विकासासाठी राज्यात काही अशासकीय संस्था पुढे आल्यानंतर त्यांना गावातून सहकार्य मिळत नाही. त्यांना कामकाजासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी पळवून लावण्याची कामे होतात. हे थांबले पाहिजे. कारणसीएसआर फंडमधून देखील ग्रामविकासाला चालना मिळू शकते. उद्योजक किंवा कंपन्या आता ग्रामविकासासाठी पुढे येत आहेत. अशावेळी गावाने किंवा गावातील जबाबदार कारभाऱ्यांनी संस्था किंवा कंपन्यांना प्रोत्साहन मिळेलअशी भूमिका स्वीकारली पाहिजे. त्यातून गावाचाच फायदा आहेअसे मत श्री. पवार यांनी व्यक्त केले.

राज्यात आज शहरीकरण झपाट्याने होते आहे. मोठी गावे निमशहरी आणि शहरांचे रूपांतर महानगरांमध्ये होते आहे. दुसऱ्या बाजूला गावे मात्र भकास होत आहेत. पूर्वी गवताची पेंढी विकून लोक आनंदाने जगत होते आता एक ट्रक कांदे विकून देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आहे. ग्रामीण व शहरी भागातील दरी वाढत असल्यामुळे शासनाला हा प्रश्न गांभीर्याने हाताळावा लागेलअसे ते म्हणाले.

इंडियात राहणाऱ्यांना पैसा कसा खर्च करायचा आणि ‘भारतात राहणाऱ्यांना पैसा कसा मिळवायचा याचा प्रश्न आहे. त्यातून मोठ्या शहरांमध्ये श्रीमंतांचे टाऊनशीप व एका बाजूला स्थलांतरित वर्गाच्या झोपडपट्टएा अशी ‘इंडो-भारत’ संस्कृती बघण्यास मिळते. शहरातील ताण कमी करण्यासाठी गावांवर लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी रोजगाराच्या संधी गावागावांमध्ये उपलब्ध करून देत स्थलांतर थांबवावे लागेलअसेही श्री. पवार म्हणाले.

ठेकेदारगुत्तेदारांनी गावे ताब्यात घेतली 
मला गावांच्या भविष्याची चिंता आहे. कारणगावांचा व्यवस्थित विकास झाला नाहीराज्यात सामाजिक विषमतेची समस्या आणखी गंभीर होईल. गावागावांमध्ये आज सामान्य गावकऱ्याला वाली राहिलेला नाही. शासकीय कार्यालयांमध्ये एजंटशिवाय कामे होत नाहीत. लाईटसिंचनासाठी एजंट लागतो. वाळू माफिया तयार झालेत. ठेकेदार व गुत्तेदारांनी गावे ताब्यात घेतल्यामुळे सामान्य गावकरी हतबल आहेत. काही गावे याला अपवाददेखील असतील. मात्रगावांमधील ‘गावपण’ आणि शहरातील ‘माणुसकी’ हरवत चालल्याचे मला स्पष्टपणे दिसते आहे. त्यामुळे आपल्याला प्रगतीच्या नावाखाली नेमके काय साधायचे आहेयाचा विचार करण्याची वेळ आली आहेअसे श्री. पवार यांनी नमूद केले.

पोपटराव पवार म्हणतात.....
राज्याला स्मार्ट सिटीपेक्षाही स्मार्टेस्ट व्हिलेजची आवश्यकता
खेड्यांकडे लक्ष द्याअन्यथा तुमची शहरे असंख्य ‘धारावीने वेढली जातील.
वनजलमातीशेतीनिसर्गाची जपणूकस्वयंरोजगार उपलब्धता व खेड्याचा सर्वांगीण सुविधा हाच राज्याचा विकासाचा पाया.
---*---
फसवणुकीनंतरही घेतली उभारी कोरफड प्रक्रियेत रोडे यांची भरारी
-
Tuesday, December 13, 2016 AT 05:45 AM (IST)
Tags: agro special
कंपनीकडून फसवणूक झालीतरी हाय न खाता जिद्दकष्ट आणि सकारात्मकतेतून संगमनेर तालुक्यातील दुर्गम भागातील नांदूर खंदरमाळचे तानाजी रोडे यांनी मात केली आहे. अवघे सहावीपर्यंत शिक्षण झालेल्या या शेतकऱ्याने संशोधकवृत्ती आणि उद्योजकतेतून कोरफडीपासून ज्युसकोल्ड्रिंक्सक्रीम बनवत भरारी घेतली आहे. 
संदीप नवले 
नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका मुळा नदीमुळे बागायती तालुका म्हणून ओळखला जातो. याच नदीवरच खंदर माळगाव हे साधारणपणे एक ते दीड हजार लोकसंख्येचे गाव असूनबहुतांश शेतकरी हे डाळिंबगहूहरभराभाजीपाला अशी पिके घेतात. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी नवीन पिके घेत असतात. नांदूर खंदरमाळ येथील पारंपरिक पद्धतीने शेती करणारे तानाजी रोडे (वय ५०) दहा वर्षांपूर्वी जाहिरातीद्वारे झालेल्या फसवणुकीनंतरही कोरफड पिकांच्या विक्रीसाठी प्रक्रिया उद्योगांची उभारणी करत यशस्वी मार्ग काढला आहे. 

खोट्या जाहिरातीचा बळी - 
साधारणतः २००४ मध्ये पुण्यातील एका खासगी कंपनीने दिलेल्या ‘कोरफड लावालाखो रुपये कमवा’ जाहिरातीला तानाजी रोडे बळी पडले. पुण्यात कंपनीच्या अधिकाऱ्याशी भेटूनकंपनीने खरेदीची हमी दिल्यामुळे स्वतःच्या सात एकर पैकी एक एकर क्षेत्रावर कोरफड लागवड केली. कोरफड काढणीला आल्यानंतर संबंधित कंपनीने आपला गाशा गुंडाळल्याचे कळले. कोरफड लागवडीत फसल्याचे लक्षात आल्यानंतर परिचितांमध्ये ते चेष्टेचा विषय झाले. अशावेळी एखादी व्यक्ती खचून गेली असतीमात्र तानाजी यांनी आत्मचिंतन करत स्वतःला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवले.

कोरफडीवर केला अभ्यास - 
कोरफडीच्या आयुर्वेदिक गुणधर्म जाणून घेतल्यानंतर त्याचे अनेक फायदे तानाजी यांच्या लक्षात आले. कोरफडीच्या नुसत्या विक्रीपेक्षा त्यापासून उत्पादनांची निर्मिती केल्यास अधिक फायदा होऊ शकतेहे त्यांच्या लक्षात आले. मग त्यातून काय काय बनविता येईलयाविषयी माहिती मिळवली. कोरफडीपासून ज्यूसकोल्ड्रिंक्सक्रीम अशी विविध उत्पादने असली तरी त्याचे प्रशिक्षण किंवा प्रकल्प जवळपास कोठेही उपलब्ध नव्हते. त्यांनी प्रयोग करण्यास सुरवात केली.

गोठ्यालाच बनवले प्रयोगशाळा - 
कोरफडीची चव कडू असल्याने औषधी असूनही सहजासहजी माणूस खात नाही. मग त्याचा ज्यूस अन्य शीतपेयांप्रमाणे गोड स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तानाजी रोडे कामाला लागले. घराजवळच्या गोठ्यातील गाई बाहेर काढत त्यांचे प्रयोग सुरू झाले. सुरवातीला कोरफड कापून त्यातून पांढरा गर बाजूला काढून विविध मिश्रणे बनवत ज्यूस बनविण्याचा प्रयत्न केला. अनेक चुकांतून शिकत योग्य असा कोरफड ज्यूस बनविला. मात्रतो चोवीस तासांपेक्षा अधिक टिकेना. तो टिकविण्यासाठी पुन्हा प्रयोग करत एक फॉर्म्युला शोधला. 

कोणत्याही फळाच्या ज्यूसपेक्षा कोल्ड्रिंक्सला अधिक मागणी असतेहे हेरून त्यांनी कोरफडीपासून कोल्डिंक्स बनविण्याचा प्रयोग सुरू केले. यात शेतीकडे दुर्लक्ष झाले. परिणामी परिस्थिती खालावली. पैशाची चणचण भासलीकी दावणीची गाय बाजारात जाऊ लागली. मात्रतानाजी यांचे संशोधन सुरूच राहिले. सुमारे पाच वर्षांनंतर कोल्ड्रिंक्स बनविण्यात यश आले. ज्यूसकोल्ड्रिंक्सक्रीम अशी विविध उत्पादने बनवली. तयार उत्पादने काही आजारी व्यक्तींना दिली. त्यांच्या चांगल्या प्रतिक्रियेमुळे उत्साह वाढला. मात्रशासनमान्य प्रयोगशाळेतून प्रमाणिकरण केल्याशिवाय व्यावसायिक उत्पादन घेता येत नसल्याचे त्यांना समजले. प्रयोगशाळेचा शोध सुरू झाला.

तपासणीचा रिपोर्ट आला अनुकूल - 
एका मित्राने सुचवलेल्या पाषाण (पुणे) येथील प्रयोगशाळेमध्ये जाण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. हातउसने पैसे घेत पुणे गाठले. मात्रतिथे फक्त औषधांची तपासणी होत असल्याचे समजल्याने ते पूर्ण निराश झाले. घरी जाण्यासाठी शिवाजीनगरला जाताना लागलेल्या कृषी विभागाच्या कृषी भवन येथे चौकशीसाठी आत गेले.
संगमनेर येथील कृषी विभागाच्या एका कार्यक्रमात भेटलेल्या युवराज साळुंखे यांची आठवण झाली. त्यांचे पद वगैरे काही माहीत नव्हते. विभागामध्ये विचारत विचारत त्यांच्या केबिनमध्ये गेले. आपल्या पिशवीतील कोरफडीचे उत्पादन दाखवत प्रयोगशाळेविषयी विचारणा केली. त्यांचे शब्द संपण्याच्या आत ‘तुमचं काम झालंलॅब आपल्याकडेच आहे’ असे संचालक साळुंखे यांनी सांगितले. त्यांच्या उत्तराने तानाजी यांचा चेहरा खुलला.
या प्रयोगशाळेत उत्पादन तपासले गेले. त्याचा रिपोर्ट अनुकूल आला. जागतिक दर्जाची गुणवत्ता व केमिकल शून्यप्रॉडक्ट मानवी वापरास योग्य असल्याचे निदर्शनास आले.

परवान्यासाठी धडपड - 
उद्योग उभारणीसाठी यंत्रे व परवाना आवश्यक होता. परवान्यासाठी मुंबईला गेल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागाप्रकल्पबांधकाम याविषयी माहिती दिली. त्यानुसार गायीच्या गोठ्यात सुधारणा करत तीन लाख खर्चात शेड उभी केली. मात्रअधिकाऱ्यांच्या तपासणीत या शेडची उंची कमी असल्याने परवाना नाकारला गेला.
आतापर्यंत पावलोपावली नकार पचवत आल्याने नकाराने न खचता ते पुन्हा मुंबईला गेले. या प्रकल्पामागचा संपूर्ण संघर्ष संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलातेव्हा फाटक्या कपड्याआड लपलेला संशोधक शेतकरी अधिकाऱ्यांना कळला. पुन्हा पाहणी करत अधिकाऱ्यांनी अखेर त्यांना परवाना दिला. तानाजी यांच्या संघर्षाचे एक वर्तुळ पूर्ण झाले असले तरी भांडवल उभारणीची खरी लढाई अद्याप बाकी होती.

कर्जासाठी शोधाशोध सुरू - 
संशोधन व अन्य धावपळीतून खिसा पुरता मोकळा झाला होता. यंत्रे घेण्यासाठी कर्ज व अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पहिले प्रकरण खादी ग्रामोद्योगकडे केलेते नामंजूर झाले. मग तानाजींना गावातील पण पुण्यात स्थायिक झालेल्या कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योगच्या शोभना सुपेकर यांची आठवण झाली. त्यांना भेटले. सुपेकर यांनी तानाजींना खादी ग्रामोद्योगच्या एक लाखाच्या अनुदान मिळवण्यासाठी मदत केली. हे अनुदान मिळणार होते प्रकल्प सुरू झाल्यावर!
गावातील बँकेकडे कर्जाचे प्रकरण दिले. मात्रतांत्रिक त्रुटी काढत ते नाकारले गेले. कागदपत्रे पूर्ण केली तरी मंजूर होण्याचे नाव घेईना. मग मात्र तानाजी यांनी या अधिकाऱ्यांविरुद्ध ग्रामसभेत आवाज उठवला. हे समजताच सूत्रे हलली. त्यानंतरही एक वर्षाने ६ लाख २२ हजार रुपये कर्जाची रक्कम त्यांच्या हातात पडली.
कर्ज मिळाले असले तरी यंत्राच्या खरेदीसाठी लागत होते १५ लाख रुपये. या वेळी मात्र त्यांचा उपहासचेष्टा करणारे मित्रनातलग त्यांच्या मागे उभे राहिले. यंत्रे आणली आणि उत्पादनाला सुरवात झाली.

मार्केटिंगसाठी केली प्रयत्नांची पराकाष्ठा - 
उत्पादन सुरू केल्यानंतर प्रश्न होता तो मार्केटिंगचा. त्यासाठी कोल्ड्रिंक्स वितरणासाठी आवश्यक क्रेट व बॉटलच्या खरेदीसाठी टप्प्याटप्प्याने आतापर्यंत सुमारे ३० लाखांची गुंतवणूक झाली आहे.
प्रॉडक्ट चांगलेपण जाहिरात करायला पैसे नव्हते. मग तानाजींनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये उत्पादन नमुन्यादाखल मोफत देणे सुरू केले. यातून जाहिरात झाली. मात्रयात ८-९ लाख रुपयांचा खर्च वाढला. त्यांच्या ग्रीन व्हॅली हर्बल्स कंपनीला पहिल्या वर्षात तोटा झाला. उत्पादनामध्ये गुणवत्ता असल्याने हळूहळू चांगली मागणी येऊ लागली.
दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अठरा लाख रुपयांचा नफा झाला. मात्रआतापर्यंत उद्योगासाठी घेतलेले कर्ज एक कोटीपर्यंत पोचले होते. ते ही त्यांनी हळूहळू फेडले.
या वर्षी कंपनीला वीस लाख रुपयांचा खर्च जाता त्यांना अठरा लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले.

विस्तारणीकरणाचे रखडले काम - 
सध्या कोरफडीवर प्रक्रिया ते मार्केटिंगच्या कामासाठी मुले गणेश व सचिन हे कार्यरत असूनसुमारे १५ ते २० जण या टिममध्ये कार्यरत आहेत. पत्नी मीराबाई व दोन्ही सुना या शेतीमध्ये लक्ष देतात.
माणसांच्या साह्याने काम सुरू असल्याने सध्या उत्पादनांना मागणी चांगली असली तरी पूर्तता करण्यात अडचणी येत आहेत. केवळ नगरपुणे व नाशिक या जवळच्या प्रमुख शहरांमध्ये विक्री केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्यांच्या उत्पादनांची घारगावआळेफाटानारायणगावखेडमंचरचाकणतळेगावअकोलासंगमनेरजुन्नरसिन्नरशिर्डीराहुरीपारनेरनगरपुणे या ठिकाणी विक्री होते.
उद्योग उभा करून साधारणपणे दहा वर्षे झाली. कर्जही फिटले आहे. कंपनीच्या विस्तारीकरणासाठी तानाजी यांचे प्रयत्न सुरू आहेत. विस्तारीकरणासाठी आवश्यक कर्जाइतके तारण नसल्याने ते रखडले आहे.

सध्या सात एकरांवर कोरफड - 
दहा वर्षांपूर्वी एक एकर असलेले कोरफडीचे क्षेत्र आता संपूर्ण सात एकर झाले आहे.
दर दोन ते तीन वर्षांनी शेतात नवीन लागवड केली जाते. गेल्या काही वर्षांत सुमारे चार ते पाच फूट अंतरावर बारबाडीन सर मिलर या वाणाची लागवड सुरू केली आहे. यात ते विविध गहूहरभरा अशी आंतरपिके घेतात.
कोरफडीवर तांबेरा सोडून इतर कोणताही रोग येत नाही. तांबेरा नियंत्रण व खतासाठी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत असल्याने एकरी दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

कोरफडीचे फायदे - 
पित्तशामकउष्णता रोधकपेस्टीसाईड व केमिकलचा साईड इफेक्ट दूर करते.
पोट साफ ठेवण्यास मदत होते.
रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
पचनक्रिया सुधारून भूक वाढते.
यकृताची कार्यशक्ती वाढते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
चेहऱ्याला लावल्यास त्वचा मुलायम होऊन त्वचा उजळ होते.
स्त्रियांसाठी अतिशय बहुपयोगी

शासनाकडून अपेक्षा - 
शासनाने शेतीपूरक उद्योगासाठी भांडवल पुरवठा होण्यासाठी कर्जाचे धोरण बदलणे गरजेचे.
उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्यास थेट अनुदान उपलब्ध करावे.
कोरफडीसह औषधी वनस्पतींच्या प्रक्रियेसाठी योग्य प्रशिक्षण मिळावे.

या प्रकारात आहेत उत्पादने उपलब्ध 
दोन वर्षांच्या कोरपडीपासून तयार केलेल्या उत्पादनांमध्ये औषधी गुणधर्म अधिक असतातत्यामुळे त्याची किंमत ही अधिक असते. (उदा. एक लिटर ज्यूस ५०० रुपये)
साधारणपणे वर्षभर व्यवसाय असला तरी हंगामानुसार काही फरक होतो. हिवाळ्याची कोल्ड्रिंक्सची मागणी निम्म्याने कमी होते. या वेळी ज्यूस व क्रीम उत्पादन व विक्रीकडे अधिक लक्ष देतो.

कोरफड ज्यूस -- ५०० मिलि --- २१५ रुपये - औषध म्हणून
कोल्ड्रिंक्स --- २०० मिलि --- १५ रुपये - जिराऑंरेज आणि लेमन या तीन फ्लेवरमध्ये उपलब्ध --- कोल्ड्रिंक
क्रीम (जेली) --- ६० ग्रॅम ---- ९७ रुपये- भाजणेमालिश केल्यास उष्णता कमी होते. --- सौदर्यवृद्धीसाठी
तानाजी रोडे९८९०३८७०१९ 
---*---
स्मार्ट’ विकासाकडे वेगाने वाटचाल करणारे विंग...
-
Thursday, December 08, 2016 AT 06:00 AM (IST)
Tags: agro special
भाजीपाला पिकवणारे गाव म्हणून कऱ्हाड तालुक्‍यातील विंग (जि. सातारा) गावची ओळख आहे. पूर्वजांपासून निर्माण झालेली ही ओळख गावाने आजही कायम राखली आहे. विकासासाठी आपापसातील मतभेद-गटतट विसरून एकत्र येणाऱ्या गावाने सर्वांच्या सहकार्यांतून व लोकसहभागातून शासनाच्या अनेक योजना गावात यशस्वीपणे राबवल्या आहेत. वारकरी सांप्रदायाची परंपरा असणाऱ्या या गावाने धार्मिक रितीरीवाजही जपले आहेत. शेतीत प्रगती करत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाची कास धरली आहे. शासन आणि लोकसहभागातून ‘स्मार्ट’ विकासाच्या दृष्टीने विंग गावची वाटचाल सुरू आहे. 
हेमंत पवार 

सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यात प्राचीन आगाशिव डोंगराच्या जवळच विंग गाव वसले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात गावातील क्रांतिकारकांनी विद्यार्थीदशेत असतानाच स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले होते. तो वारसा गावाला लाभला आहे. गावची शेती कृष्णा कारखान्याच्या विंग-येरवळे-घारेवारी उपसा सिंचन योजनेच्या पाण्यासह शेतकऱ्यांच्या खासगी विहिरीतून सिंचनाखाली आणण्यात आली आहेत्यामुळे शेतीला पाण्याचा प्रश्‍न फारसा जाणवत नाही. त्यामुळेच येथील शेतकऱ्यांनी ऊस या पारंपरिक पिकांबरोबरचे कमी कालावधीत पैसे उपलब्ध करून देणारी भाजीपाल्याची पिकेही घेण्यावर पहिल्यापासूनच भर दिला आहे. टोमॅटोवांगीफ्लॉवरकोबी आदिंसह पालेभाज्या असा विविध शेतमाल शेतकरी पिकवतातत्यामुळे विंग गावाला भाजीपाला पिकवणारे गाव म्हणूनही सातारा जिल्ह्यात ओळखले जाते.

कृषी विभागाच्या अनेक योजनांचा लाभ 
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती केल्याशिवाय पर्याय नाही हे आता शेतकऱ्यांना पटले आहे. त्यामुळेच कृषी विभागाच्या पुढाकाराने गावामध्ये शेतकऱ्यांचे बचत गट स्थापन करण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत विधायक काम सध्या गावामध्ये सुरू आहे. गावातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेतून पॉवर टीलररोप लावणीचे यंत्ररोटाव्हेटर यासारखी औजारे देण्यात आली आहेतत्यामुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदेउपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरातसुनील ताकटे व कर्मचाऱ्यांनी गावामध्ये कृषी विभागाच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर थेट बांधावर भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

सर्व क्षेत्र ठिबकखाली आणण्यासाठी जागृती 
पिकांना आवश्‍यकतेपेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढून ती वापरास अयोग्य होत असल्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती झाली आहे. त्या माध्यमातून गावातील बहुतांश सर्व क्षेत्र ठिबक व तुषार सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. शासनाचे त्यासाठी मिळणारे अनुदान आणि शेतकरी हिस्सा यांचा मेळ घालून हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. त्यालाही शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अनेक पुरस्कारांचे मानकरी गाव 
विंग गावामध्ये लोकसहभागातून शासनाचे अनेक अभियानमोहिम व योजना यशस्वी करण्यात आल्या आहेत. त्याबद्दल राज्य शासनामार्फत महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमपर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनानिर्मलग्राम अभियानसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आदि योजनांमध्ये बक्षीस देऊन गावाला गौरवण्यात आले आहे. त्याचबरोबर स्वच्छ-सुंदर गाव बनवण्यासाठीही सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

२४ तास शुद्ध पाणी योजना प्रगतिपथावर 
गावच्या विकासातील ‘माईलस्टोन’ ठरणाऱ्या २४ बाय ७ पाणी योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. ही योजना लवकरच पूर्ण होईल. त्या माध्यमातून ‘मिनरल वॉटरसारखे शुद्ध आणि स्वच्छ पाणी २४ तास गावकऱ्यांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

जिल्हा परिषद शाळा ‘आयएसओ’ 
गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे लोकसहभागातून रुपडे पालटण्यात आले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचा दर्जा सुधारण्यासाठीही शिक्षकांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. शाळा म्हणून जे निकष लागतातते सर्व पूर्ण केल्याने शाळेला ‘आयएसओ’ मानांकनही मिळाले आहे. त्यामध्ये गावच्या लौकिकात भर पडली आहे.

गावावर सीसीटीव्हीची नजर 
अनेकदा गावांतील लोक शेतात गेल्यानंतर घरी कोणी नसतेत्यामुळे चोरीचे प्रकार घडतात. चोरी झाल्यानंतर मग त्यावर चर्चा सुरू होते. त्याला आळा घालून गावामध्ये कोण आले-गेले याची माहिती व्हावी आणि लोकांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी विंग ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही बसवले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरील परिसर आणि गावच्या इतरही ठिकाणांच्या हालचाली त्या कॅमेऱ्यातून टिपल्या जात आहेत.

गावचे तंटे गावातच 
गावामध्ये अनेक कारणांवरून वादावादीभांडणेकलह होतात. त्याची पोलिस दरबारी नोंद झाल्यावर दोन्ही बाजूंकडील लोकांना तिकडे हेलपाटे मारावे लागतात. त्यातून पैसावेळ वाया जाऊन मानसिक स्वास्थ्यही हरवले जाते. त्याचा विचार करून गावातील ज्येष्ठांनी गावचे बहुतांश तंटे समोपचाराने गावातच सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याद्वारे दोन्ही परस्परविरोधी गटांच्या लोकांना समोरासमोर बोलावले जाते. तंटामुक्त समितीगावचे पदाधिकारीज्येष्ठ यांच्यासमोर त्या तंट्याचे निरसन करून सामोपचारातून त्यातून मार्ग काढला जातोत्यामुळे लोकांना होणारा मानसिक त्रास कमी होण्यास मदत होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून गावचे कौतुक 
गावात शासनाच्या महाराजस्व अभियानातून पाणंद रस्ते खुले करण्याची मोहीम प्रांताधिकारी किशोर पवारतहसीलदार राजेंद्र शेळकेमंडल अधिकारीतलाठी यांच्या माध्यमातून राबवण्यात आली. त्याद्वारे गावात अनेक वर्षांपासून बंद असलेले पाणंद रस्ते खुले झाल्याने अनेक शेतकऱ्यांची सोय झाली आहे. त्याबद्दल सातारचे जिल्हाधिकारी अश्‍विन मुदगल यांनी गावामध्ये येऊन कौतुक केले.

""
विंग गावाला सामाजिकसांस्कृतिक वारसा आहे. तो टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गावच्या विकासासाठी गावातील सर्वांचेच चांगले सहकार्य लाभते. गावातील शेतकरीही शेतीमध्ये सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून कमी क्षेत्रात जास्त पीक उत्पादन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. गावच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने आम्ही प्रयत्नशील आहोत. यापुढे संपूर्ण गावची शेती ठिबकखाली आणण्याबरोबरच गाव ‘सोलर ग्राम तसेच ‘स्मार्ट ग्राम’ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.''
शंकरराव पाटील-९४२१११६०३७
सरपंचविंग 
---*---

किलोला २५०० रुपये दराने देशी तुपाची विक्री
-
Friday, December 23, 2016 AT 06:00 AM (IST)
Tags: agro special
३० देशी गायींचे संगोपन गोमूत्रगांडूळखतनैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती 
वेदशास्त्राच्या अभ्यासातून मिळालेले ज्ञान व गायींप्रति जिव्हाळा या गोष्टींच्या आधारे वाटेगाव (जि. सांगली) येथील भिडे कुटुंबाने देशी गोपालन सुरू केले. आरोग्यदायी तुपाचे मार्केट अोळखून त्याच्या उत्पादनावर भर दिला. गेल्या १२ वर्षांत त्याला २५०० रुपये प्रतिकिलो दराने राज्याच्या बाहेरही चांगले मार्केट तयार केले. तेवढ्यावर न थांबता गोमूत्रशेणजीवामृतसौंदर्यप्रसाधने आदींच्या उत्पादननिर्मितीतून व्यवसायाचा विस्तारही केला. आज या उत्पादनांना चांगली मागणी येत असल्याचे भिडे सांगतात.
अभिजित डाके 

सांगली जिल्ह्यातील वाटेगाव (ता. वाळवा) परिसरात उसाची मोठी शेती आहे. साखर कारखानाही आहे. याच गावात भिडे कुटूंब राहते. मूळचे रत्नागिरी जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या भिडे कुटुंबांची सुमारे सातवी पिढी आज वाटेगाव येथे राहते. त्यांची एक गुंठाही शेती नाही. कुटुंबातील सध्याच्या पिढीचे प्रतिनिधित्व प्रतीक करतात. त्यांच्या वडिलांचा पूर्वी ट्रक व्यवसाय होता. त्यांनी प्रतीक यांना त्यांच्या नवव्या वर्षांपासून केरळ येथे वेदशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पाठविले होते. सन २००४ पर्यंत प्रतीक यांनी वेदशास्त्राचे धडे घेतले. दरम्यानकाही वर्षांपूर्वीच वडिलांनी ट्रक व्यवसाय बंद केला. खिलार देशी गायीचे संगोपन करण्यास सुरवात केली. प्रतीक यांनीही केरळमध्ये ज्या वेदशाळेत शिक्षण घेत होते तेथे गोसंगोपनाचे धडे गिरवले होते. साहजिकच गायींप्रति लळा लागला होता. त्यामुळे दुसऱ्या कोणत्या व्यवसायाचा न करता गोसंगोपनच करण्याचा निर्णय घेतला. आज एका खिलार गायीपासून त्यांच्या गोठ्यात २५ ते ३० गायी मुक्तपणे वावरू लागल्या आहेत. पैकी कांकरेज ६ व उर्वरित गीर आहेत. ‘मोरया गोसंवर्धन’ असे या गोठ्याला नाव दिले आहे. सर्व गायी व पैदासासाठी वळू गुजरातमधून आणले आहेत. शुद्ध वंश असल्याने पुढील पिढीही त्याच गुणवत्तेची घडत आहे.

गोसंगोपनाचा प्रसार अाणि विस्तार 
देशी गायी या शेतकऱ्यांसाठी वरदानच आहेत. त्यांच्यापासून मिळणारी प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याला आर्थिक उन्नती देणारी आहे अशी भिडे यांची विचारसरणी आहे. हे विचार केवळ आपल्यापुरते न ठेवता त्यांचा शेतकऱ्यांत प्रसारदेखील त्यांनी केला आहे. आज १२ वर्षांचा गोसंगोपनातील त्यांचा अनुभव तयार झाला आहे.

देशी तूपनिर्मिती हा मुख्य व्यवसाय 
सन २००७ च्या सुमारास देशी तूपनिर्मिती सुरू केली. आज याच उत्पादनावर सर्वाधिक भर असतो. हे काम चुलीवर मातीच्या भांड्यांमध्ये किंवा दगडी भांड्यांत पारंपरिक पद्धतीनेच केले जाते. त्यामुळेच तुपात सर्व सत्वे उतरतात व त्याची वेगळी चव मिळते असे भिडे म्हणतात. पुणे येथील एम.डी. आयुर्वेद असलेल्या डॉ. रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुपातील आरोग्यदायी घटकांची तपासणी करून घेतली.

तुपाचे मार्केटिंग 
वास्तविक आपणच उत्पादीत मालाचे मार्केटिंग करणे ही कला खूप अवघड आहे. भिडे यांनी त्यात हातखंडा मिळवला आहे. त्यांनी मार्केटिंगसाठी गावातूनच सुरवात केली. गावात अनेकजण "मॉर्निंग वॉकम्हणजे सकाळी फिरायला जातात. हीच वेळ गाठून चौकात स्टॉल उभा केला. तेथून येणाऱ्या- जाणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधत तुपाचा नमुना दाखवण्यास सुरवात केली. 

अनेक वर्षांपासून गोशाळा सांभाळत असल्याने राज्याबरोबरच परराज्यातूनही अनेक अभ्यास सहली येथे येतात. त्यातील प्रत्येकाला नमुन्यापुरते तूप काही शुल्क आकारून दिले जायचे. पुढे हेच लोक भिडे यांच्या तुपाला आॅर्डर देऊ लागले. तुपाची ‘माउथ पब्लिसिटी’ होऊ लागली. हळूहळू ग्राहकांची संख्या वाढू लागली. आज मुंबईपुणेहैद्रराबाददिल्ली आदी ठिकाणी भिडे यांच्या देशी गायीच्या तुपाला मागणी आहे. मागणी फोनद्वारे केली जाते. त्यानंतर कुरिअरद्वारे ते पाठविले जाते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तुपाच्या दरात वाढ झाली आहे. सुरवातीला १२०० रुपयांपासून विक्रीला सुरवात केली. आज २५०० रुपये प्रतिकिलो दराने ग्राहक ते विकत घेतात. प्रत्येक गाय दर दिवसा सात लिटर दूध देते. सुमारे २२ ते २५ लिटर दुधापासून एक किलो तूप बनते. महिनाकाठी सुमारे ५० ते ७० किलो तुपाची विक्री होते. सध्या तुपाला मागणी जास्त आहेत. उत्पादन अपुरे पडते आहे. हे लक्षात घेऊन येत्या काळात गायींची पैदास वाढवण्याचा विचार आहे.

अन्य उत्पादनांतून व्यवसाय विस्तार 
केवळ तुपावर अवलंबून राहून व्यवसायवृद्धी होणार नाही हे समजले. त्‍यानंतर गेल्या वर्षापासून नैसर्गिक स्त्रोतांवर आधारित साबणशाम्पूदंत मंजन ,धुपकांडीतेल आदी रासायनिक विरहीत उत्पादनांची निर्मिती व विक्री सुरू केली आहे. या व्यतिरिक्त गोमूत्र अर्क २५० रुपये प्रति लिटर दरानेदशपर्णी अर्क लिटरला ५० रुगांडूळखत किलोला ३० रुपयेशेण किलोला १० रुपये तसेच जीवामृत पावडर आदींची विक्रीही सुरू केली आहे. शेतकऱ्यांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. वर्षभरात या उत्पादनांची विक्री सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत गेली आहे. काही उत्पादनांना ‘फूड सेफ्टी’ विषयातील केंद्रीय संस्थेचा परवाना घेतला आहे. अन्य उत्पादनांसाठीही संबंधित प्रमाणपत्रे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गोशाळेची जागा 
भिडे यांच्या घरासमोर धर्मनाथ महाराज या नाथ संप्रदायातील महान योगींची समाधी अाहे. येथील ८ एकर जमीन देवस्थानासाठी आहे. यातील ४ एकर जमीन भिडे यांना देशी गोसंगोपन या हेतूसाठी कमी शुल्कात भाडेतत्त्वावर दिली आहे. गायींसाठी लागणारी वैरणखाद्य आज विकत घ्यावी लागते. मात्र देवस्थानच्या मिळालेल्या जागेत काही गुंठ्यात यंदा यशवंत गवताची लागवड केली आहे. त्यामुळे पुढील काळात ताजी वैरण गायींसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे वैरणीवरील खर्च कमी होईल. एकूण काय आज या ठिकाणी गोशाळेच्या रूपाने नंदनवन उभे राहिले आहे हे मात्र नक्की.

कुटुंबाची साथ 
प्रतीक यांचे वडील उमेशआई प्रियांकाबहीण प्रतिज्ञा असे भिडे कुटुंबातील सर्व सदस्य गोशाळेची सर्व कामे अत्यंत आनंदाने सांभाळतात.

संपर्क : प्रतीक भिडे - ९४०३७७९९०१ 

---*---

No comments:

Post a Comment