समस्येच्या मुळापर्यंत पोचलं मारवडचं 'ROOT'...
-
Thursday, June 23, 2016 AT 05:45 AM (IST)
Tags: agro special
जळगाव जिल्ह्यात मारवड (ता. अमळनेर) येथे तरुण, ग्रामस्थ, नोकरदार, व्यावसायिक आणि दानशूर व्यक्तींच्या एकत्रित योगदानातून
माळण नदी पुनरुज्जीवनासह नाला खोलीकरण व रुंदीकरणाची अनेक कामे सध्या सुरू आहेत.
समस्येच्या मुळापर्यंत पोचलेल्या "रुट' संकल्पनेच्या प्रवाहात सामील झालेल्या मारवड विकास मंचाने
आजतागायत सुमारे ४० लाखांपेक्षा जास्त निधी विविध कामांसाठी उभा केला आहे.
"गाव करील ते राव काय करील', याची प्रचिती तेथील जलसंधारणाची विविध कामे पाहून येऊ लागली
आहे.
जितेंद्र पाटील
आयुष्याच्या वाटचालीत प्रगती केल्यानंतर जन्मभूमीकडे मागे वळून पाहताना तेथील विकासासाठी शक्य होईल, तेवढे योगदान देण्याच्या चळवळीला मारवडकरांनी ‘ROOT’ (Return to Origin & Organize Transformation), असे नाव दिले आहे. रुट या शब्दाचा अर्थ मूळ असा अभिप्रेत आहे. त्यानुसार, गावातील प्रत्येकाने शक्य असेल त्या प्रमाणात आपल्या मुळाला म्हणजे गावाला मदतीचा हात द्यावा; भावी पिढी सशक्त व बुद्धिवान, आत्मविश्वासयुक्त आणि सेवाभावी व्हावी, याकरिता योग्य वातावरण निर्मितीसाठी पुढे यावे, असे बरेच उद्देश रुट संकल्पनेतून जोपासले जात आहेत. आपले गाव, आपली माणसे, आपली माती ही प्रत्येकासाठी मुळेच असतात. कुठेतरी गावाने, थोरामोठ्यांनी, गावातील संस्कारांनी आपल्या हृदयावर, मनावर खोल ठसा उमटविलेला असतो. ते संस्कार, तो आधार, तो ओलावा आणि जिव्हाळ्याच्या बळावर आपण आयुष्यात प्रगतीची अनेक शिखरे चढत असतो. त्यामागे स्वतःचे प्रयत्न असले, तरी गावाच्या मुळांचा अदृश्य आधार असतोच. त्याअनुषंगाने पुढे गेल्यानंतर गावाकडे आणि तेथे राहणाऱ्या माणसांकडे मागे वळून पाहणे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. या सर्व गोष्टींची जाणीव ठेवूनच मारवड येथील मूळ रहिवासी व सध्या नागपूर येथे अप्पर आयुक्त असलेले संदीपकुमार साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता विजय भदाणे, पुणे येथे स्थायिक उद्योजक प्रताप शिंदे, नंदुरबार येथील पोलिस निरीक्षक गिरीश पाटील यांच्यासह राकेश गुरव, गोकूळ पाटील, देवेंद्र साळुंखे, विनोद चौधरी, राकेश नीळ, महेश चौधरी, शरद साळुंखे, सुनील साळुंखे, बंटी साळुंखे आणि गणेश विलास साळुंखे यांनी मारवड गावाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा विडा उचलला. राजू साळुंखे, चेतन चौधरी, अक्षय साळुंखे, तेजस साळुंखे, जयकर सोनवणे, अतुल साळुंखे, सायली गुरव, कीर्तीका पाटील, सेजल, मीनल, वैष्णवी हे छोटे मावळेही त्यांच्यासोबत उभे राहिले.
"रुट'च्या विकासाचा पाया "सृजन गट'
अप्पर आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांनी शालेय जीवनापासूनच मारवड गावाचे नाव उज्ज्वल करण्याचे स्वप्न जणू पाहिले होते. १९९२ मध्ये दहावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश संपादन करून त्यांनी बोर्डात प्रथम क्रमांक पटकावला होता. २००४ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय राजस्व सेवा म्हणजे "आयआरएस' मध्ये त्यांची निवड झाली. साळुंखे यांना प्रशासनातील सर्वोच्च स्थान मिळाल्यानंतर मारवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. त्यांच्या आधी गावाचे सुपुत्र शरद पाटील यांनी उपजिल्हाधिकारी, तर गिरीश पाटील यांनी पोलिस उपनिरीक्षकपदावर आपला ठसा उमटविला होताच. गावातील धडपडणाऱ्या तरुणाईसाठी संदीपकुमार साळुंखे यांनी प्रशिक्षण काळात प्रत्येक शनिवारी व रविवारी अमळनेर येथे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग सुरू केले. मारवड व परिसरातील खेड्यातले तरुण त्याठिकाणी एकत्र आले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या गटाला "सृजन परिवार' नाव मिळाले. या परिवारातील सदस्यांची संख्या सुरवातीला केवळ पाच - सहा इतकीच होती. कालांतराने ग्रामीण भागातील तरुणांसाठी ते नैराश्यातून बाहेर काढणारे, भरकटलेल्या आयुष्याला दिशा देणारे एक केंद्र बनले. त्यातूनच एक दिवस "मारवड विकास मंचा'ची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून गावाच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पावले उचलण्यात आली. "रुट'च्या विकासाचा पाया खऱ्या अर्थाने "सृजन गटा'ने रचला.
आधी केले मग सांगितले !
मारवड विकास मंचाद्वारे गावातील सामाजिक कार्याची सुरवात स्वतःपासून करायची, असे सर्वानुमते ठरले. त्यासाठी प्रत्येकाने दर महिन्याला १०० रुपये आपल्या स्वकर्ष्टाजित रकमेतून जमा करण्याचा नियम तयार झाला. त्यानुसार, मंचाचे सुमारे ९० सदस्य आजतागायत वार्षिक १२०० रुपये वर्गणी भरत आहे. लवकरच सदस्यांची संख्या २०० पर्यंत पोचण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याची गटात चर्चा केली जाते. सदस्यांच्या सूचनांवर विचार करून मगच निर्णय घेतला जातो. त्यानुसार गावाचा विकास करताना ते लोकसहभागातून करून घेण्यास प्राधान्य देण्यात येते. नंतर अन्य पर्यायांचा विचार होतो. जेणेकरून गावातील लोकांनाही रोजगार मिळू लागला. जमा झालेल्या वर्गणीतून नंतरच्या काळात जिल्हा परिषदेच्या शाळेचे नूतनीकरण व गुणवत्ता वर्धनासाठी प्रयत्न झाले. सर्व शाळा खोल्यांचे रंगकाम, ई- लर्निंग हॉल व सॉफ्टवेअर, संगणक लॅब, मुलींच्या शाळेला फेन्सिंग, पटांगणाचे सपाटीकरण आदी बरीच कामे पूर्णत्वास नेण्यात आली. मंचाच्या सदस्यांची धडपड पाहून गावातील नागरिकांनीही शक्य तेवढी मदत केली. कोणी विहीर खोदल्यानंतर निघालेले दगड, मुरूम उपलब्ध करून दिला, कोणी ट्रॅंकर व जेसीबी मोफत किंवा अत्यल्प भाड्याने दिले.
उगवली विकासाची पहाट...
सामाजिक कामे करीत असताना अनियमित पावसामुळे उभी ठाकलेली दुष्काळी परिस्थिती मारवड विकास मंचाच्या नजरेतून सुटली नाही. गावाची पर्यायाने शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेण्याचा निर्धार सर्व सदस्यांनी त्यामुळे केला. त्यातूनच गावाजवळून वाहणाऱ्या माळण नदीच्या पुनरुज्जीवनाचे कार्य हाती घेण्यात आले. नदी खोलीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज भासणार होती. मात्र, वेळ वाया घालवूनही उपयोग नव्हता. मंचाच्या सदस्यांनी त्यामुळे लोकवर्गणीतून तब्बल सात लाख रुपयांची रक्कम उभी केली. जलसंधारणाच्या कामांना एकदाची सुरवात झाल्यानंतर बजाज उद्योग समूहाने "सीएसआर'चा सुमारे ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. याशिवाय मुंबईच्या श्रीराज फाउंडेशनकडून १० लाख रुपये, जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य व्ही. आर. पाटील यांनी पाच लाख रुपये असा निधी मिळाला. पैशांची अडचण संपली, तशी विकासकामांची गती वाढली. उपलब्ध निधीद्वारे माळण नदी पात्राचे एक किलोमीटर अंतराचे खोलीकरण व रुंदीकरण पूर्ण झाले असून, त्यात यंदाच्या पावसाळ्यात सुमारे साडेसहा कोटी लिटर पाणीसाठा होण्याचा अंदाज आहे. उल्लेखनीय म्हणजे जलसंधारणाची कामे करताना निघालेला मुरूम व दगड गावातील दलित वस्ती व परिसरातील शेतरस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वापरले गेले आहेत. वृक्ष लागवडीची मोहीम अधिक व्यापक बनली आहे. याशिवाय सायन्स गार्डन, भूमिगत गटार, जलशुद्धीकरण प्रकल्प, युवा केंद्र, ध्यान केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, व्यसनमुक्ती व शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संकल्प मारवड व परिसर विकास मंचाने केला आहे.
(चौकट)...
"माळण' नदी पुनरुज्जीवनासाठी १० कोटींचा निधी
मारवड विकास मंचाने हाती घेतलेल्या जलसंधारणाच्या कामांची दखल जळगावच्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनीही घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांनी मारवड गावाजवळून वाहणाऱ्या "माळण' नदीच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला होता. सुमारे १० कोटी रुपये खर्चाच्या त्या आराखड्यास मान्यता मिळाली असून, त्यापैकी १.३३ कोटी रुपये खर्चाच्या निविदा मंजूरदेखील झाल्या आहेत. त्यामुळे "माळण' नदीला नवीन जीवन मिळण्याची चिन्हे दिसून आली आहेत.
"देशासाठी व गावासाठी काहीतरी भन्नाट करावं, रोजच्या मिळमिळीत आयुष्याला दिव्यत्व प्राप्त करून द्यावं, शेतकऱ्यांसाठी व गावातल्या शिक्षणासाठी काहीतरी निर्माण करावं, असे वाटणारी तरुणाई तसेच नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक, गावकरी आणि दानशूर व्यक्तींनी मारवड गावात प्रामुख्याने रुट संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यातून सर्वांच्या जीवनाला एक वेगळा अर्थही प्राप्त झाला आहे. रुट संकल्पनेचा आदर्श घेऊन जळगाव जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यभर आता परिवर्तनाची नवी पहाट उगवण्याची आशा आम्हाला वाटू लागली आहे.
- संदीपकुमार साळुंखे, अप्पर आयकर आयुक्त, नागपूर.
संपर्क : संदीपकुमार साळुंखे : ९९७०८४६६३६
गोकूळ पाटील : ८८८८९९२७२७ \

---*---
शेततळ्यातील मत्स्यपालनाने दिला मोठा आधार
Wednesday, June 22, 2016 AT 09:15 AM (IST)
Tags: agro special
पाण्यासाठी विहीर पुनर्भरणासह वनराई बंधाऱ्याची करतात
उभारणी
वरुडी (ता. बदनापूर, जि. जालना) येथील जयकिसन शिंदे यांनी फळबागेच्या संरक्षित पाण्यासाठी केलेल्या शेततळ्यामुळे बाग तर जगलीच; पण त्यात केलेल्या मत्स्य व्यवसायामुळे गेल्या तीन वर्षांतील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाचा भार वाहण्यास मदत केली आहे. शेतीबरोबरच मत्स्यपालनामध्येही त्यांनी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला आहे.
संतोष मुंढे
जालना जिल्ह्यातील वरुडी (ता. बदनापूर) येथील जयकिसन रामदास शिंदे यांच्याकडे केवळ ३ एकर ११ गुंठे शेती आहे. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर १९९८ मध्ये शेतीत उतरल्यानंतर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरवातीला विविध पिकांचे प्रयोग केले. त्या वेळी त्यांच्याकडे मोसंबीची साडेतीनशे झाडे व एक संकरित गाय होती. हळूहळू त्यात वाढ करत चार गाई केल्या. शेतीसिंचनासाठी सामायिक दोन विहिरी होत्या. मात्र, त्यातील पाणी पुरत नसे. त्यामुळे त्यांनी २००२ पासून विहीर पुनर्भरणाचे प्रयोग सुरू केले. नाल्याचे पाणी विहिरीत सोडल्याने परिसरातील सर्व विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होत असे.
हार मानायची नाय...
२००० मध्ये केलेला एक एकर द्राक्ष व आधीपासून असलेली मोसंबीची बाग त्यांना दुष्काळामुळे काढावी लागली. मात्र, हार न मानता जयकिसन यांनी पुन्हा ६६ गुंठ्यांमध्ये साडेचारशे डाळिंब झाडे लागली. पुढे २००६-०७ मध्ये मोसंबीची ११२ झाडे लावली. त्यांनी २०११ पर्यंत उत्पादन दिलं. मात्र, २०१२ च्या दुष्काळात ती काढावी लागली. परंतु न डगमगता त्यांनी पुन्हा त्याच क्षेत्रात २०१३ मध्ये भगवा जातीच्या डाळिंबाची ५८४ झाडे लावली आहेत.
सतत प्रयोगशील
- २००८ मध्ये जयकिसन यांनी कृषी विभागाच्या संपर्कातून गांडूळ खत व गांडूळ पाण्याचा प्रयोग केला.
- २०११ पर्यंत एकात्मिक कीड व्यवस्थापनात सहभाग नोंदविला.
- शेतीशाळेमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यातून त्यांनी २०१२ मध्ये स्वमालकीच्या व काकांच्या विहिरीचे पुनर्भरण केले.
- २०१३ पासून शेतालगतच्या पाटावर दर वर्षी २ ते ५ वनराई बंधारे उभारतात. त्यामुळे पाणी अधिक मुरते. त्याचा सर्वांनाच फायदा होतो.
शेतीविषयक जाण वाढली...
- पीक वाचविण्यासाठी २००८-०९ मध्ये त्यांनी गतिमान पाणलोटक्षेत्र विकास कार्यक्रमातून मंजूर २० गुंठे क्षेत्राऐवजी ३० गुंठे क्षेत्रात शेततळे घेतले. पहिल्याच वर्षी भाऊ कल्याण शिंदे व वडिलांच्या मदतीने पाइपलाइनने शेततळ्यात पाणी आले. त्या पाण्यामुळे २०१२ च्या दुष्काळातही ५० गुंठे बाग वाचविण्यात त्यांना यश आले.
- एप्रिल २०१३ मध्ये अडगाव येथे झालेल्या सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक शेती शिबिरात भाग घेतला. तसेच कृषी विभागामार्फत बंगलोर अभ्यास दौऱ्यामुळे त्यांची शेतीविषयक जाण वाढली. शेतीतील खर्च कमी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. ॲग्रोवनच्या वाचनातून तळ्यात मत्स्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
- जुलै २०१३ मध्ये शेततळ्यामध्ये मासळीच्या विविध जातींची २० पाकिटे बीज सोडले. एका पाकिटामध्ये ७०० ते १००० बीज असतात. अनुभव नसतानाच्या या काळात ॲग्रोवनमधील मत्स्य व्यवसायावरील सचिन साटम व रवींद्र बोंद्रे यांच्या लेखमाला फायद्याची ठरल्याचे शिंदे यांनी सांगितले.
प्रशिक्षण आवश्यकच...
कोणत्याही प्रशिक्षणाविना सुरू केलेल्या मत्स्य व्यवसायामध्ये त्यांच्याकडून अधिक बीज सोडले गेले. त्याचा फटका बसला. त्याचप्रमाणे ३-४ महिने मत्स्य खाद्यासाठी गिरणीचे पीठ व शेण स्लरी ते वापरत. त्यामुळे खाद्य वाया जाण्याचे प्रमाण अधिक होते. ७ ते ११ जानेवारी २०१४ या काळात सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे प्रशिक्षण घेतले. त्यांच्या मत्स्यसंगोपनाची दिशा बदलली. ते भाताचा कोंडा, शेंगदाणा पेंड, मक्का भरडा, गहू, तांदूळ, ज्वारी बाजरी, चुन्नी यांसारख्या खाद्याचे योग्य प्रकारे नियोजन करू लागले. प्राणीप्लवंग निर्मितीसाठी स्लरीबरोबर युरिया व सुपर फॉस्फेटची जोड देऊ लागले. पहिले तीन महिने १० ते १२ किलो तीन दिवसाला, तर तीन महिन्यांनंतर ऋतुमानातील बदलानुसार खाद्यपुरवठा करीत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. उष्णता वाढल्यास कमी खाद्य लागत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. मत्स्य व्यवसायाच्या अनुषंगाने मार्च ते मेदरम्यान ते शेततळ्यातील पाण्याचे परीक्षण करतात.

अनुभवानुसार मत्स्य व्यवसायात बदल...
१) पाण्याचा उपसा व पुनर्भरणावर भर - तज्ज्ञ शेततळ्यातील प्लवंग वाढीवरील विपरीत परिणाम टाळण्यासाठी पाण्याचा उपसा न करण्याविषयी सांगतात. मात्र, शेततळ्यांचा आकार मोठा असल्याने डाळिंबाला पाणी देण्यासाठी पाण्याचा उपसा व पुनर्भरणाचे एक चक्र शिंदे यांनी बसवले आहे. त्यामुळे माशांना ऑक्सिजन उपलब्धता वाढते. मरसह अन्य समस्या कमी होत असल्याचा शिंदे यांचा अनुभव आहे.
२) प्राणीप्लवंग निर्मितीसाठी जीवामृताचा वापर - प्राणीप्लवंग निर्मितीसाठी युरिया व सुपर फॉस्फेटचा उपयोग न करता महिन्यातून एक किंवा दोन वेळेस जीवामृताची स्लरी वापरतात. जीवामृतामध्ये गुळाऐवजी शेतातील चिकू व पपईचा गर वापरतात.
३) खाद्याची सुविधाही बदलली - सुरवातीला थेट खाद्य टाकल्यामुळे खाद्य वाया जात होते. ते टाळण्यासाठी शेततळ्यावर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तार बांधली. या तारेला ४० ते ४५ फूट आतमध्ये पाच फुटाचे अंतर सोडत एकाखाली एक या प्रमाणे तीन गोण्या अडकल्या. त्यामुळे प्रत्येक थरातील माशांना त्यांच्या थरामध्ये खाद्य उपलब्ध झाले.
थेट शेततळ्यावरून होते विक्री
- शिंदे यांच्या शेततळ्यात देशी माशांच्या प्रकारात रोहू, कटला, मृगल, तर विदेशी माशामध्ये सिल्व्हर कार्प, सायपरनस जातीचे मासे आहेत. चवदार असल्याने सायपरनसला जवळपास १५० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
- जूनमध्ये आवक कमी असल्याने त्यांच्या ८०० ते ९०० ग्रॅम वजनाच्या माशांना चांगली मागणी असते. यंदा गावातूनच दोन क्विंटलची ऑर्डर आतापर्यंत मिळाली आहे. त्यासाठी १२० ते १५० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळतो.
असे मिळाले उत्पादन व उत्पन्न
- २०१३-१४ - मत्स्य उत्पादन ६ क्विंटल - खर्च ४० हजार रुपये - उत्पन्न ७२ हजार रुपये - नफा ३२ हजार रुपये.
- २०१४-१५ - मत्स्य उत्पादन १७ क्विंटल - खर्च ६० हजार रुपये - उत्पन्न १ लाख ८३ हजार रुपये - नफा १ लाख २३ हजार रुपये.
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी केले नियोजन...
२०१३ मध्ये केवळ जीवामृताच्या साह्याने बाजरीचे पीक घेणाऱ्या जयकिसन शिंदे यांनी मूग, उडिद, चवळी, सोयाबीन, भूईमूग या आंतरपिकाला प्राधान्य दिले आहे.
- यंदाच्या खरिपात डाळिंबात मूग, उडीद, सोयाबीनचे नियोजन केले आहे.
- केवळ शेततळ्याच्या आधारावर दोन एकर कांदा जगवला होता. यंदा पुन्हा जुलैमध्ये कांदा लागवडीचे नियोजन आहे.
- एका एकरात २० किलो तागही टाकण्याचे नियोजन आहे.
- आंबा, ॲपल बोर, सीताफळाची किमान २०० झाडे लावण्याचेही त्यांचे नियोजन आहे.
संपर्क -
जयकिसन शिंदे, ९५९५६१४०७०

डाळींब
बाग व्यवस्थापनातून मिळवा दर्जेदार उत्पादनon September
14, 2015
महाराष्ट्र राज्यात गेल्या तीन शतकांपासून
डाळिंब एक महत्त्वाचे नगदी फळपीक बनलेले आहे. डाळींबामध्ये असलेले औषधी गुणधर्म, उच्च
पौष्टिकता व १२ महिन्यातील तीनही हंगामात फळ मिळत असल्याने या सदाबहार फळपीक
महत्त्व वाढले आहे. राज्यात सध्या सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना व लातूर जिल्ह्यांमध्ये व्यापारी तत्त्वावर डाळिंबाची
लागवड केली जाते. डाळिंबाच्या बागेतून अधिक दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी योग्य
नियोजन करणे आवश्यक आहे. योग्य बहार, हंगाम निवडीप्रमाणेच पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे
आवश्यक असते.
हवामान : दीर्घ उष्ण उन्हाळा, कोरडी हवा व साधारण कडक हिवाळा अश्या प्रकारचे वातावरण या
पिकाच्या वाढीकरिता व उत्पादनाकरीता आवश्यक असते. फळधारणेपासून फळे तयार होईपर्यंत
कडक उन्ह व कोरडी हवा आणि पक्वतेच्या काळात साधारणपणे उष्ण व दमट हवामान असल्यास
चांगल्या दर्जाची फळे मिळतात.
जमीन : जमीन हलक्या ते मध्यम प्रतीची, एक
मीटर खोल व उत्तम निचऱ्याची असावी. भारी व चिबड जमिनीत डाळिंबाची लागवड करू नये.
मुक्त चुन्याचे प्रमाण ५ ते ६ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये कारण अश्या जमिनीत
सुक्ष्य अन्नद्रव्ये व स्फुरदची कमतरता आढळून येते. जमिनीचा सामू ६.५ ते ८.०
यामध्ये असावा. पृष्ठभागाखाली पाण्याची पातळी तीन मीटरपेक्षा खाली असावी.
जाती : डाळिंबाच्या भगवा, गणेश, मृदला, मस्कत, फुले आरक्ता या प्रमुख जाती आहेत. या जातींपैकी भगवा ही जात
जास्त उत्पादन देणारी असून या फळांमध्ये गुणवत्तेचे अपेक्षित घटक आढळतात. फळाचा
आकार मोठा असून बी किंवा दाणे चमकदार व टपोरे असतात. केशरी संगाची साल असलेली फळे
काढणीनंतर जास्त काळ टिकत असल्याने दूरवरच्या बाजारपेठेसाठी उपयुक्त ठरतात. इतर
वाणांच्या तुलनेत हा वाण फळांवरील काळ्या ठिपक्याच्या रोगास तसेच फुलकीडीस कमी
प्रमाणात बळी पडणारा आहे.
लागवड
डाळिंबाची लागवड चौरस किंवा आवश्यकतेनुसार
आयताकार पद्धतीने करणे अंतरमशागतीच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. नवीन
शिफारशीप्रमाणे आयताकार पद्धतीचा वापर करून ४.५ बाय ३ मीटर अंतरावर लागवड करणे
जास्त फायद्याचे ठरते. लागवडीसाठी ६० बाय ६० बाय ६० से.मी. आकाराचे खड्डे एप्रिल
ते मे मध्ये खोदून; पंधरा ते वीस दिवस कडक उन्हात तापू द्यावीत. जेणेकरून
सुत्रकृमी, इतर अपायकारक किडी व जीवाणूंचा उन्हामुळे नैसर्गिकरीत्या
नाश होतो. नंतर तळाशी ०.१ टक्के बाविस्टीन द्रावण ओतून त्यावर १०० ग्रॅम लिंडेन
पावडर टाकून पालापाचोळ्याचा थर द्यावा. त्यानंतर शेणखत, गांडूळखत, ट्रायकोडर्मा
व अझाटोबेक्टर जीवाणू मिश्रण, रासायनिक खते व माती यांच्या मिश्रणाने खड्डा
भरून घ्यावा. जुलै ते ऑगस्ट हा लागवड करण्यसाठी योग्य कालावधी आहे. मुळाशी असलेला
मात्तीचा गड्डा फुटू न देता रोपांची लागवड करून लगेच पाणी द्यावे.
· छाटणी व वळण देणे : जमिनीपासून
२ ते २.५ फुटापर्यंत फुटवे येऊ देऊ नयेत. चांगली वाढ झाल्यानंतर साधारणतः तीन खोडे
ठेऊन डाळिंबाचे झाड वाढविल्यास झाडांना योग्य आकार मिळतो, उत्पादन
वाढते. झाडे ताणावर सोडली असताना करावयाच्या छाटणीत एक वर्ष जुनी वाढ छाटावी
जेणेकरून फळधारणा चांगली होते. दरवर्षी नवीन फांद्याचा एक संच सर्व बाजूंनी विकसित
होऊ द्यावा.
खत व्यवस्थापन
झाडांच्या चांगल्या वाढीसाठी व दर्जेदार
उत्पदनासाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा नियमीत पुरवठा करणे आवश्यक आहे. खतांची
गरज झाडांच्या वयानुसार वाढत जाते. शेणखत व रासायनिक खतांचा वापर खालीलप्रमाणे
करावा.
झाडाचे वय
|
प्रति झाड खतमात्रा
|
एक वर्ष
|
१० किलो शेणखत, २५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद व १२५ ग्रॅम पालाश
|
दोन वर्ष
|
२० किलो शेणखत, २५० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद व १२५ ग्रॅम पालाश
|
तीन वर्ष
|
३० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद व १२५ ग्रॅम पालाश
|
चार वर्ष
|
४० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, १२५ ग्रॅम स्फुरद व २५० ग्रॅम पालाश
|
पाच वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय
|
५० किलो शेणखत, ६२५ ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व २५० ग्रॅम पालाश
|
लागवडीनंतर पहिल्या वर्षी शिफारस केलेली
खतांची मात्रा एक महिन्याच्या अंतराने विभागून द्यावी. यामध्ये शेणखत, स्फुरद, पालाश
व नत्राची अर्धी मात्रा बहार धरण्याच्या वेळी द्यावी. डाळिंबाला फुले येण्यापूर्वी, पूर्ण
फुलोऱ्यात असताना व फळे पक्व होण्याच्या वेळेस ०.४ टक्के फेरस सल्फेट, ०.४
टक्के मेंगनीझ सल्फेट, ०.२ टक्के बोरिक असिड व ०.३ टक्के झिंक सल्फेट एकत्रित करून
फवारणी करावी.
बहार नियोजन
डाळिंबाच्या झाडाला सर्व बहारात फुले येतात.
आंबे बहरात झाडांना जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात फुले तर जुने-ऑगस्ट महिन्यात फळे
येतात. मृग बहारात झाडांना जून-जुलै महिन्यात फुले तर नोव्हेंबर-जानेवारी महिन्यात
फळे येतात आणि हस्त बहारात झाडांना सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात फुले तर मार्च-मे
महिन्यात फळे येतात. या तीन बहारांपैकी कोणताही एक बहार घ्यावा. प्रत्येक वर्षी
तोच बहार घ्यावा, त्यात बदल करू नये. बहार धरताना झाडांना ताण देण्यासाठी
४०-५० टक्के पानगळ होईल, अशा रितीने जमिनीचा दर्जा लक्षात घेऊन दीड ते दोन महिने
पाण्याचा ताण द्यावा. झाडांना ताण देण्याच्या कालावधीत जमिनीची नांगरणी करावी.
पानगळ होण्यासाठी ५ टक्के युरियाची किंवा १.५ ते २ पी.पी.एम. ईथेलची फवारणी करावी.
ताण तोडताना शिफारशीनुसार शेणखत आणि रासायनिक खतांच्या मात्रा देऊन त्यास हलके
पाणी द्यावे नंतर हळूहळू वाढवत जावे. काही दिवसांतच झाडांना नवीन पालवी फुटण्यास
सुरुवात होते. या काळात वाळलेल्या फांद्या छाटून सरळ, जोरकस
वाढणाऱ्या फांद्या ठेऊन बागेत २.५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड आणि १.५ मि.ली.
मोनोक्रोटोफॉस १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन
डाळिंबाच्या झाडाची जोमदार वाढ होण्यासाठी
झाडांना नियमित पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. पाणी देताना पाण्याचे
प्रमाण हे हंगाम, झाडाचे वय व वाढीची अवस्था यावर गोष्टीं विचारात घेऊन
ठरवावे. पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनपद्धतीचा वापर करावा. इतर पद्धतीपेक्षा हि
पद्धत सर्व दृष्टीने सोयीस्कर व फायदेशीर आहे, यामुळे ४३ टक्के पाण्याची बचत होऊन ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत
उत्पन्न वाढते. उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, पावसाळ्यात १३ ते १४ दिवसांनी तर हिवाळ्यात १७ ते १८
दिवसांनी पाणी द्यावे. मृग बहारात जून ते सप्टेंबर दरम्यात २० ते ३० लिटर, हस्त
बहारात सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान १७ ते २० लिटर तर आंबे बहारात जानेवारी ते मे
दरम्यान १७ ते ४४ लिटर पाणी प्रति झाड दर १० दिवसांनी द्यावे. यात जमिनीची पाणी
धरून ठेवण्याची क्षमता पाहून बदल करावा.
कीड व रोग व्यवस्थापन
डाळिंबावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव
टाळण्यासाठी व्यवस्थित निचरा होणाऱ्या जमिनीत झाडांची लागवड करावी. लागवड
करण्यापूर्वी २ टक्के कार्बेन्डेझिनच्या द्रावणात रोपे ओले करावीत. किडी व रोगाचे
लक्षणे आढळल्यास लगेच उपाय योजना कराव्यात. प्रादुर्भाव झालेले झाडाचे भाग काढून
टाकून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून किडी व रोग बागेत पसरणार नाहीत.
लाल कोळी, फळ पोखरणारी अळी, साल खाणारी अळी, खोडकीडा, पिठ्या ढेकूण, इ. किडी तर पाने व फळावरील ठिपके, फायटोप्थोरा
ब्लाईट, फळकुज इ. रोग डाळिंबावर आढळतात. त्यांचे नियंत्रण
शिफारशीनुसार दिलेल्या फवारण्या नियमित करून करावी.
फळ काढणी
फुले आल्यापासून फळे तयार होण्यास साधारणपणे
१३५ ते १८८ दिवसांचा कालावधी लागतो. एका झाडावर ६० ते ८० फळे ठेवावीत. जास्त फळे
ठेवल्यास ते आकाराने लहान राहतात. फळ तयार झाल्यानंतर त्याचा गोलसरपणा जाऊन
फळांच्या बाजूवर चपाटेपणा येतो. फळ दाबल्यास सालीचा विशिष्ट करकर आवाज येतो, तसेच
फळाचा रंग बदलतो. फळांची काढणी सिकेटरच्या सहाय्याने करावी. काढणी शक्यतो सकाळी व
संध्याकाळी करावी. जास्त भाव मिळण्यासाठी सर्व काढलेली फळे एकत्रित करून त्यांचे
वजन, आकारमान, रंग इ. वरून प्रतवारी करावी. वाहतुकीमध्ये होणारे नुकसान
टाळण्यासाठी व वाहतूक सुलभ करण्यासाठी फळांचे पॅकिंग करावे. यासाठी विविध
प्रकारच्या पेट्या, करंड्या, खोके, गोण्या, कोरोगेटेड फायबर बोर्ड बॉक्स, इ. वापर करण्यात येतो.
बाजारपेठेत आवक जास्त असेल किंवा भाव कमी
असेल आणि भविष्यात भाव वाढण्याची हमी तर फळे शीतगृहात साठवून ठेवणे फायद्याचे
ठरते. ५ अंश सेल्सियस तापमान आणि ८० ते ९५ टक्के सापेक्ष आद्रता ठेवल्यास
डाळिंबाची फळे ३० दिवसांपर्यंत टिकून राहू शकतात. – श्री. विनायक शिंदे-पाटिल (पी.एच.डी – फळशास्ञ),
अहमदनगर, ०९४२२२२११२०.
अहमदनगर, ०९४२२२२११२०.
काढणी :
फलधारणेपासून फळे तयार होण्यास जातीपरत्वे १३५ ते १७० दिवस लागतात. मृग बहाराची फळे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये तयार होतात. आंबे बहाराची फळे मे च्या दुसर्या आठवड्यापासून विकण्यास तयार होतात. जून, जुलैमध्ये माल खूप निघतो. हंगाम १५ ऑगस्टपर्यंत चालतो. आंबे बहराची फुले जानेवारी - फेब्रुवारीमध्ये येतात. फळे एकदम येत नसल्यामुळे ६ ते ८ वेळेस तोडणी करावी लागते. डाळींबाच्या चांगल्या फळांना मार्केटमध्ये फेब्रुवारी ते मार्च (द्राक्षाअगोदर) तसेच १५ जुलै ते १५ ऑगस्टमध्ये (कारण या काळात मार्केटमध्ये दुसरी फळे नसतात म्हणून) मागणी असते. परंतु अशा फळांची काढणी अगोदर (फळ पक्व होण्यापूर्वी ) १ महिन्यामध्ये १५दिवसाच्या अंतराने २ वेळा क्रॉंपशाईनर, राईपनर व न्युट्राटोन फवारले असता फळांना गर्द सफरचंदासारखा लाल कलर येउन अधिक पैसे कमविता येतात. समजा उशीर होत असेल तर ३ -४ महिने अगोदर नियोजन करावे लागेल. किंगसाईजच्या डाळींबाकरिता क्रॉप - शाईनरचे प्रमाण वाढविल्यास फळांना शाईनिंग येईल. राईपनर वापरताना दक्षता घ्यावी, कारण राईपनर वापरल्यानंतर ८ दिवसातच फळ पूर्ण लालबुंद सफरचंदासारखे होते. निर्यातीकरिता मार्केटची डिमांड, बोटीची वाहतूक, क्वारन्टाईन अॅक्त (Quarantine Act) खरेदी करणारे निर्यातदार या सर्वांची साखळी अगोदर बांधून सज्ज राहणे. त्या दृष्टीने वेळापत्रक आखणे, असे केल्यास तारांबळ उडणार नाही.
उत्पादन :
कलमांपासून दीड ते दोन वर्षात उत्पादन सुरू होते, तर रोपांपासून अडीच ते तीन वर्ष उत्पादनास लागतात.
पहिला बहार - ६० ते ८० फळे ( १५ ते २५ किलो)
दुसरा बहार - ८० ते १०० फळे (२५ ते ३० किलो )
तिसरा बहार - १०० ते १५० फळे (३० ते ५० किलो)
झाडांची संपूर्ण वाढ झाल्यानंतर म्हणजे ५ ते ६ व्या वर्षापासून प्रत्येक झाडापासून २०० ते ३०० फळे मिळतात. १५ वर्षापर्यंत चांगले पीक येऊ शकते.
पुणे मार्केटसाठी मध्यम प्रतीची (५०० ते ७५० ग्रॅम वजनाची ) तर कलकत्ता मार्केटसाठी ३०० ते ४०० ग्रॅम वजनाची आणि दिल्ली मार्केटसाठी ७५० -१५०० ग्रॅम वजनाची डाळींब फळे चांगल्या भावाने विकली जातात.
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्प्तामृताच्या नियमित योग्य प्रमाणात फवारण्या केल्यास फळे जाड सालीची मोठ्या आकाराची, आकर्षक रंगाची होऊन मार्केटमध्ये हमखास चांगला भाव मिळतो.

सालदाराचा मुलगा झाला यशस्वी लघुउद्दोजक
-
Wednesday, August 17, 2016 AT 04:30 AM (IST)
Tags: agro special
तळोदा (जि. नंदूरबार) येथील सालदार कुटुंबातील भिकाभाऊ
चौधरी यांनी हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून स्वतःला पुढे नेत लघुउद्योजक म्हणून
घडवण्यापर्यंत मजल मारली आहे. धडाडी, शिकाऊ वृत्ती, काळाच्या गरजेनुसार गांडूळखत, निंबोळी पावडर, रोपनिर्मिती व्यवसायांची उभारणी, उत्पादनांची चोख गुणवत्ता, पारदर्शकता आदी गुणांचा विकास केल्यानेच
उल्लेखनीय आर्थिक व कौटुंबिक प्रगती करणे त्यांना शक्य झाले आहे.
पद्माकर कुंदे
नंदूरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग आदिवासी, डोंगराळ आहे. जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण असलेल्या तळोदा येथे भिकाभाऊ काशिनाथ चौधरी राहतात. घरची काहीच शेती नाही. वडील सालदार म्हणून दुसऱ्यांच्या शेतात राबत. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यामुळे १२ वी झाल्यानंतर भिकाभाऊ वन विभागात रोजंदारीवर कामाला लागले. सुमारे २० वर्षांपासून ते या विभागात मजूर म्हणून कार्यरत आहेत. स्वतःचा व्यवसाय करावा, आर्थिक प्राप्ती वाढवावी, मोठे व्हावे असे त्यांना खूप वाटे. त्या दृष्टीने विविध व्यवसायाच्या चाचपण्या केल्या.
गांडूळखत निर्मितीला सुरवात
सुरवातीला भिकाभाऊंनी गांडूळखत निर्मितीला सुरवात केली. स्वतःची जागा नसल्याने भाडेतत्त्वावर जागा घेतली. कायम नवे काही शिकण्याची त्यांची वृत्ती त्यांना पुढे घेऊन गेली. त्यांनी गांडूळांच्या विविध जाती, खतनिर्मिती आदी बाबी अभ्यासल्या. या विषयावरील पुस्तके वाचली. हळूहळू व्यवसायात जम बसू लागला. ज्ञान घेण्याच्या वृत्तीने त्यांचा संपर्क नंदूरबार कृषी विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ज्ञांशी येऊ लागला. तेथील चर्चेतून रोपनिर्मिती, निंबोळी पावडर निर्मितीची संधी लक्षात आली. धडाडी, हिंम्मत, जोखीम घेण्याची वृत्ती, बाजारपेठ अोळखण्याची क्षमता, उद्योजकता आदी गुण अंगी बाणवले.
मध्यंतरीच्या काळात नुकसानही
मधल्या काळात अतिपावसाच्या कारणामुळे गांडूळखत व्यवसायाचे मोठे नुकसानही झाले. त्यानंतर अन्य व्यक्तीकडून भाडेतत्त्वावर जागा घेत व्यवसाय सुरू केला. दरवेळी नवे करून पाहण्याच्या वृत्तीतून कांडी कोळसा उत्पादनही करून पाहिले, पण त्यात यश आले नाही.
व्यवसायात वृद्धी
सध्या गांडूळखत निर्मिती, रोपवाटिका, निंबोळी पावडर या व्यवसायांचा भिकाभाऊंनी चांगलाच विस्तार केला आहे. जिल्ह्यातील दोंडाईचा ही निंबोळीची मोठी बाजारपेठ आहे. भिकाभाऊ येथून निंबोळया (कच्चा माल) खरेदी करतात. कमी पडल्यास गुजरात व मध्य प्रदेशातूनही खरेदी होते. निंबोळी पावडर व पेंड निर्मितीची यंत्रे गुजरातमधून खरेदी केली आहेत. जागा भाडेतत्त्वावरील असल्याने तेथे वीज नाही. ट्रॅक्टरवरील इंजिनाचा आधार घेऊन त्याआधारे यंत्रे चालविली जातात.
उत्पादनांना मिळवले मार्केट
व्यवसाय १
गेल्या चार वर्षांत निंबोळी पावडरची झालेली विक्री
पहिले वर्ष : १० टन
दुसरे वर्ष : २५ टन
तिसरे वर्ष : ३० टन
यंदाचे चौथे वर्ष : ५० टन (उत्पादन ७० टनांपर्यंत केले आहे.)
- निंबोळी पावडर व पेंड किलोला ४ रुपये दराने विकली जाते.
- गेल्या दोन महिन्यांत ५० टन पेंडीची विक्री केली आहे.
-पपई, केळी, डाळिंब उत्पादक तसेच नंदूरबार कृषी विज्ञान केंद्रातून या उत्पादनांची खरेदी केली जाते.
- दरवर्षी ३० ते ५० लिटर निमतेलही बनवले जाते. त्यापासून २० ते २५ हजार रुपये मिळतात.
- परिसरात असलेला वाव :
फळे व भाजीपाला पिकांंत लागवडीनंतर एकरी २ ते ४ क्विंटल निंबोळी पेंड जमिनीत मिसळून देण्याची
पद्धत या भागात प्रचलीत आहे. काही भागात सूत्रकृमींचा प्रादुर्भाव असल्यानेही या पेंडीचा वापर केला जातो.
व्यवसाय २
गांडूळखत
- एकूण ७६ बेड आहेत. दर महिन्याला सुमारे ४०० बॅग्ज खत उत्पादीत केले जाते.
- जवळपास सर्व खताची विक्री होते. शेतकऱ्यांबरोबरच पुण्यातील काही व्यावसायिकदेखील त्यांचे ग्राहक आहेत.
- ५० किलोच्या बॅगला २०० रुपये दर आकारला जातो.
- या व्यतिरिक्त मागणीनुसार व्हर्मीव्हॉश विकले जाते. पूर्वी त्यांच्याकडे केवळ ३ किलो गांडूळे होती. आता त्यांची संख्या ७ ते ८ क्विंटलपर्यंत पोचली आहे. ५०० रुपये प्रति किलो दराने गांडूळेही विकली जातात.
व्यवसाय ३
रोपनिर्मिती
- मिरची, केळी आदींची रोपे बनवली जातात. वर्षाला सुमारे ५० हजार ते एक लाख रोपांची होते निर्मिती.
- एकूण व्यवसायातून वर्षाला १० ते १५ टक्के नफा मिळतो.
टू व्हीलर वर ‘जय जीवाणू’ नाव
टू व्हीलर असो की फोर व्हीलर, अनेक हौशी वाहनचालकांना आपल्या वाहनावर ठळक स्वरूपात काही ना काही संदेश देण्याची किंवा लिहिण्याची सवय असते. भिकाभाऊंनी मात्र आपल्या गाडीवर जे काही लिहिले आहे त्यासाठी त्यांची तारीफच केली पाहिजे. शेतीत जीवाणूंचे असलेले महत्व त्यांनी अोळखले. आपल्या गाडीवर जय जीवाणू असे दर्शनी भागात लिहून जीवाणूंचे महत्त्वच त्यांनी सर्वांपर्यंत पोचवले आहे.
आई तुझा आशीर्वाद
भिकाभाऊंच्या आईने (मंजुळाबाई) जुन्या काळात सुईणीची भूमिका यशस्वी पार पाडली. त्यांच्यामुळे ६०० च्यावर मुले सुखरूप जन्माला आली. नुकतेच त्यांच्या आईचे निधन झाले. आपल्या वाटचालीत आईचे मार्गदर्शन व आशीर्वाद सर्वात मोलाचा असल्याचे ते अभिमानाने सांगतात.
केव्हीके ठरला मार्गदर्शक
नंदूरबारच्या कृषी विज्ञान केंद्राचे मला नियमित मार्गदर्शन होते. त्यांच्यामुळेच शेतीतील विविध तंत्रज्ञान कळून नवनवीन व्यवसाय करण्याची उर्मी तयार होते असे भिकाभाऊ म्हणतात.
सर्व मुलांना उत्तम शिक्षण
भिकाभाऊंची एक मुलगी एमएस्सी झाली आहे. एक मुलगी व मुलगा बीएस्सीचे शिक्षण घेत आहेत. मुलीचे लग्न, घर उभारणी हे सर्व व्यवसायातूनच शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
व्यवसाय करायचा तर तुमचा ग्राहकांवर प्रभाव पडला पाहिजे. त्यासाठी मी फोर व्हीलर घेतली. जुन्या गाड्या घ्यायच्या व त्या पुन्हा विकायच्या असा मला छंद आहे. आत्तापर्यंत अशाप्रकारे ४० गाड्या बदलल्या आहेत.
- उत्पादनांचा दर्जा मी टिकवला आहे. गांडूळखताची गुणवत्ता अोळखण्याच्या बाबींचे प्रात्यक्षिक मी शेतकऱ्यांना दाखवतो. निंबोळी पावडरही त्यांच्या समक्ष बनवतो. गुणवत्ता व पारदर्शकता या दोन माझ्या जमेच्या बाजू असल्याने ग्राहकांचा विश्वास कमावला आहे.
भिकाभाऊ चौधरी - ९४२३४९६९१९
पद्माकर कुंदे - ९८९०७५६१४१

No comments:
Post a Comment