Sunday, 12 February 2017

प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा....भाग-4 (ॲग्रोवन या वृत्तपत्रातून संकलित)

शिक्षकाची नोकरी सांभाळून शेळीपालनात रोवले पाय
जितेंद्र पाटील
Sunday, January 03, 2016 AT 12:30 AM (IST)
असंतुलितपणे रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता धोक्‍यात आल्याने सेंद्रिय खताच्या उपलब्धतेसाठी कापडणे (जि. धुळे) येथील शैलेंद्र पाटील यांनी शेळीपालनाची सुरवात केली. शिक्षकाची नोकरी आणि शेळीपालन व्यवसायअशी दुहेरी जबाबदारी पेलताना थोडी ओढाताण होत असली तरी कामातून मिळणारा आनंद त्यांना सतत उत्साहित करीत असतो. याशिवाय शेतीपूरक व्यवसायाचा नवा मार्ग त्यांना शेळीपालनातून गवसला आहे. 

धुळे जिल्ह्यातील कापडणे येथील मूळ रहिवासी असलेले शैलेंद्र पाटील यांची एकत्रित कुटुंबाची सोनगीर शिवारात वडिलोपार्जित सुमारे ३२ एकर शेती आहे. शैलेंद्र यांचे वडील दंगल पाटील यांना सुरवातीपासूनच सेंद्रिय शेतीचा व्यासंग होता. शेतीत रासायनिक खताचा वापर न करता फक्त शेणखत वापरून पिके घेण्यावर त्यांचा नेहमीच भर असायचा. शेण मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी घरच्या गोठ्यात चार बैलजोड्या तसेच काही गायीदेखील सांभाळल्या होत्या. हयात असेपर्यंत त्यांनी जमिनीचा पोत अन्‌ शेतीची सुपीकता बिघडू दिली नाही. शैलेंद्रविजयसुनीलसंजय या चारही मुलांनी आपल्या पश्‍चात सेंद्रिय शेतीची परंपरा कायम ठेवावीअशी त्यांची इच्छा होती. सन २००८ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर शिक्षणनोकरीनिमित्त शेतीपासून दूर राहिलेल्या चारही मुलांचा शेतीशी संबंध आला. मात्रदररोजच्या व्यस्ततेमुळे जातीने लक्ष देणे अवघड झाल्याने गोठ्यातील जनावरांची संख्या हळूहळू कमी होत गेली. शेतीत शेणखताअभावी रासायनिक खतांचा वापर करण्याची वेळ आली. शेणखताचा वापर कमी आणि अनियंत्रितपणे रासायनिक खतांच्या वापराने जमिनीची सुपिकता कमी होऊ लागली. त्यामुळे पीक उत्पादनावर परिणाम झाला. अशा परिस्थितीत वडिलांनी अंगीकारलेल्या सेंद्रिय शेतीचे महत्त्व सर्वांना पटले. डीटीएडची पदवी घेऊन नुकतीच शिक्षकाची नोकरी पत्करलेल्या शैलेंद्र यांनी २०१० मध्ये सेंद्रिय खताच्या उपलब्धतेसाठी दोन बैलजोड्या खरेदी केल्या. मात्रबैलांपासून मिळणारे शेणखत सर्व शेतीला पुरत नव्हते. अशावेळी त्यांनी बाहेरून शेणखत विकत घेण्याची तयारी ठेवली. परंतुगावातील अन्य शेतकऱ्यांकडेही शेणखत मिळत नसल्याने मोठी पंचाईत झाली. शेणखतासाठी म्हशी विकत घेण्याचा त्यांनी विचार केला. मात्रपुरेसा वेळ देऊ शकणार नसल्याच्या कारणावरून म्हैस पालनाचा विचारही मागे पडला. कमी खर्चातकमी देखभालीत होणारा व शेतीला पुरेसे लेंडीखत मिळवून देणारा शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याचा ध्यास शेवटी शैलेंद्र पाटील यांनी घेतला.

स्थानिक शेळ्यांची खरेदी...
धुळे तालुक्‍यातील कापडणे गावापासून ७० किलोमीटर अंतरावर शिरपूर तालुक्‍यातील कटपडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरीनिमित्त स्थायिक असल्याने शेळीपालन सुरू केले तरी रविवारव्यतिरिक्त अन्य दिवशी आपल्याला वेळ देता येणार नाहीयाची जाणीव शैलेंद्र यांनी होती. मात्रसुनील आणि संजय या दोन्ही भावांनी "तू शेळीपालन सुरू करआम्ही दोघे लक्ष ठेवू', असे सांगून हिंमत दिली. धुळ्यात माध्यमिक शिक्षिका असणाऱ्या वंदना यांनीही पतीच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यानुसार एक लाख रुपये खर्च करुन शेतात एका बाजूला एक हजार चौरस फुटांचे पक्के शेड बांधण्यात आले. शेळ्या खरेदी करण्यापूर्वी त्या व्यवसायातील अनुभवी व्यक्ती तसेच तज्ज्ञांची मदत घेतली. बाहेरून महागड्या संकरित शेळ्या विकत आणण्याऐवजी स्थानिक गावरान शेळ्यांची निवड केली. साधारणतः कमी वयाची करडे आणि गाभण शेळ्या टप्प्याटप्प्याने विकत घेतल्याने किंमत कमी पडली. अशा प्रकारे मे २०१५ मध्ये खऱ्या अर्थाने शेळीपालनाची सुरवात झाली. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांच्या गोठ्यातील लहान व मोठ्या सर्व शेळ्यांची संख्या ५७ वरून आता ११० पर्यंत पोचली आहे. सध्या शेळ्यांची संख्या वाढविणे हाच उद्देश असल्याने करडांची किंवा शेळ्यांची विक्री त्यांनी सुरू केलेली नाही. करडांची व्यवस्थित निगा ठेवल्याने मरतुकीचे प्रमाण नगण्य आहे.

नोकरीनिमित्त लांब वास्तव्यास असल्याने शैलेंद्र यांना शेळ्यांकडे रोज लक्ष ठेवणे शक्‍य होत नाही. रविवारी कोणत्याही परिस्थितीत त्यांचा संपूर्ण दिवस शेतात जातो. शेळ्यांची तपासणीलसीकरणचाऱ्याची व्यवस्था या गोष्टी या दिवशी प्राधान्याने पार पाडल्या जातात. शेळ्या चारण्यासाठी पाच हजार रुपये महिना वेतनाने सालगडी ठेवला आहे. सकाळी सात ते दुपारी बारा तसेच दुपारी तीन ते सायंकाळी सहाया कालावधीत शेळ्या रानात चरण्यासाठी जातात. जास्तीत जास्त बाहेर राहिल्याने शेळ्या चरून मोकळ्या राहतात. खाद्य व चाऱ्यावरील खर्चात मोठी बचत शक्‍य होते. हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी शैलेंद्र यांनी १५ गुंठ्यावर ल्यूसर्न गवताची लागवड केली आहे. शिवाय कोरड्या चाऱ्यासाठी कडबा राखून ठेवला जातो.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर
शेळ्यांना होणाऱ्या रोगांची जोखीम कमी करण्यासाठी शैलेंद्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देतात. घटसर्पलाळ खुरकूतपीपीआरचे लसीकरण ठरलेल्या वेळी झाले पाहिजेयासाठी ते नेहमीच आग्रही असतात. याशिवाय वेळोवेळी जंत निर्मूलन करून घेतात. पावसाळ्यात शेळ्यांचे खुरांमध्ये जखमा होऊ नये याची काळजी घेतली जाते. नोकरी सांभाळून सर्व गोष्टी वेळेवर शक्‍य न झाल्यास उगाच नुकसान नको म्हणून सालगड्यास त्यांनी शेळी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले आहे. स्वतः शैलेंद्र रविवारी शेळ्यांचे डॉक्‍टर बनतात. मोबाईलच्या माध्यमातून सालगडी व दोन्ही भावांशी संपर्कात राहिल्याने बऱ्याच अडचणी दूर होतात. नोकरी सांभाळून शेळीपालन व्यवसायाकडे लक्ष देताना थोडी ओढाताण होते. प्रसंगी सुटीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर शेतात थांबून राहावे लागते. बऱ्याचदा पत्नी व दोन्ही मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही. परंतुकाहीतरी वेगळे करीत असल्याचा आनंद नवा उत्साह देऊन जातोअसे शैलेंद्र सांगतात.

लेंडीखतामुळे पीक जोमदार...
गोठ्यातील शेळ्यांची संख्या वाढल्यानंतर शैलेंद्र यांना रोज ३० किलो लेंड्या गोळा होतात. गांडूळ खताचा वापर शेतात करून शेती उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने त्यांनी यंदाच्या खरिपात प्रयोग केला. त्याचे चांगले परिणाम पहिल्याच प्रयत्नात दिसूनही आले. पाऊसमान कमी असले तरी साडेतीन एकरांतून त्यांना सहा क्विंटल मुगाचे उत्पादन मिळाले. मुगानंतर त्या शेतात आता साडेतीन एकरात कांद्याचे पीक घेतले आहे. गांडूळ खताच्या वापरामुळे कांदा पिकाची वाढ जोमदार झाली असूनसाधारण ३०० क्विंटल कांदा उत्पादन मिळण्याची शक्‍यता आहे. लेंड्यांमुळे शेतात बाभूळ वाढण्याचा धोका संभवतो. त्यामुळे गांडूळ खताचा वाफा त्यांनी शेळ्यांच्या गोठ्यालगत उभारले आहेत.

संपर्क ः शैलेंद्र पाटील ः ९४०४८१२६०२.

---*---
बायोगॅस तंत्रज्ञानाबाबत माहिती द्यावी.

Monday, October 19, 2015 AT 06:15 AM (IST)
Tags: agro guide
एस. एच. कानवडेचंदगडजि. कोल्हापूर 
बांधकामाच्या रचनेवरून तरंगती गॅसटाकी संयंत्र आणि स्थिर घुमट संयंत्रअसे बायोगॅसचे प्रकार आहेत. तरंगत्या टाकीचा बायोगॅस चांगला चालतोपण त्यासाठी बराच खर्च येतो. संयंत्रावर तरंगणारी लोखंडी टाकी गंजल्यास किंवा काही कारणांनी निकामी झाल्यास ती दुरुस्त करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी बराच खर्च येतो. सध्या महाराष्ट्रात स्थिर घुमट संयंत्र प्रकारातील दीनबंधू बायोगॅस बांधले जातात.

बायोगॅस संयंत्राचे बांधकाम - 
1) 
बायोगॅस बांधण्यासाठी घराजवळची उंचमोकळीकोरडी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी जागा निवडावी.
2) 
जागा शक्‍यतो गोठ्याजवळ किंवा घराजवळ असावी.
3) 
जमिनीखालील पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असावी.
4) 
निवडलेल्या जागेजवळ पाण्याची विहीर व हातपंपतसेच झाडे नसावीत.
5) 
बायोगॅसच्या आकारानुसार (घ. मी.) प्रत्येक दिवशी लागणारे शेण (किलो) वापरावे. शेण व पाणी सम प्रमाणात घेऊन मिसळावे. त्यातून कचरा काढून संयंत्रामध्ये सोडावे. थंडीच्या दिवसांत शक्‍यतो कोमट पाण्याचा वापर करावा.
6) 
संयंत्राच्या प्रवेश कक्षावर व निकास कक्षावर उघडझाप करणारी झाकणे बसवावीतजेणेकरून त्यातून माणूसप्राणी इत्यादींचा आत प्रवेश होणार नाहीयाची काळजी घ्यावी.
7) 
संयंत्राच्या निकास कक्षातून पाचक यंत्रामधील द्रावण हलवावेजेणेकरून शेणावर जमा होणारी साय ढवळली जाईल.
8) 
घुमटाला नेहमी मातीने झाकून ठेवावे.
9) 
पाइपलाइनमध्ये पाणी साचू नये म्हणून पाणी काढण्याच्या नळीतून नियमित पाणी काढावे. 

संपर्क - प्रा. प्रकाश बंडगर - 9764410633
पद्‌मश्री डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय,
तळसंदेजि. कोल्हापूर. 
डाळींब फळझाडाचा बहार कसा धरावा ?
अनेकदा डाळींबास कितव्या वर्षी फळे धरावीत हे शेतकऱ्यांना माहित नसते. म्हणजेच फळझाड लावल्यानंतर कितव्या वर्षी फळे घेण्यास सुरुवात करावी याची माहिती असणे जरूरीचे आहे. लागवडीनंतर पहिल्या २- ३ वर्षात झाडांची वाढ चांगली होण्याच्या दृष्टीने या काळात फळे धरू नयेत. या झाडावर येणारी फळे वेळीच काढून टाकावीत. सर्व साधारण झाडे ३ - ४ वर्षाची झाल्यावर नियमीत बहार धरावा.

डाळींबास आपल्या हवामानात कमी जास्त प्रमाणात वर्षभर फुले येतात. जानेवारीजून आणि ऑक्टोबर महिन्यात फुले लागण्याचे प्रमाण जास्त असते. जानेवारी महिन्यात लागणार्‍या फुलांना आंबे बहार म्हणतात. कारण याच महिन्यात आंब्यासही मोहोर येतो. जून महिन्यात येणार्‍या बहारास मृग बहार म्हणतात. कारण या काळात मृग नक्षत्र सुरू होते. आणि ऑक्टोबर महिन्यात येणार्‍या बहारास हस्त बहार म्हणतात कारण त्यावेळी पावसाचे हस्त नक्षत्र असते.

डाळींब उत्पादनासाठी त्याचा बहार धरणे ही क्रिया फार महत्त्वाची असते. डाळींबाची फुले ही मागील हंगामातील पक्व काडीवर येतात. या काडीचे पोषण व्यवस्थित होणे गरजेचे असते. या फुटीवरील पाने अन्न तयार करून काडीत साठवितात. फुले येण्याचा जेव्हा हंगाम असतो त्याच काळात झाडावर नवीन पालवी येते. काड्यातफांद्यात आणि खोडात ज्या प्रमाणात अन्नसाठा असतो त्यानुसार नवीन फुटीचे साधारण तीन प्रकार पडतात. एक पालवीसह फुले येणेदुसरा नुसती फुले येणे आणि तिसरा नुसती पालवी येणे होय. म्हणजेच अन्नसाठा जर फारच कमी असेल तर येणारी नवीन फुट फक्त्त पालवीच असते. म्हणजेच फुले नसतात. असलीतरी ती फार कमी प्रमाणात असतात. अन्नसाठा मध्यम स्वरूपाचा असेल तर पालवी आणि फुले सारख्या प्रमाणात लागतात. आणि जेव्हा अन्नसाठा मोठ्या प्रमाणात असतो तेव्हा फुले भरपूर लागतात त्या मानाने पालवी कमी असते.

खोडात अन्न साठविण्याच्या प्रक्रियेस सी: एन रेशो असे म्हणतात. सी म्हणजे कर्बो हायड्रेटस आणि एन म्हणजे नायट्रोजन (नत्र) होय. खोडांमध्ये यांचे प्रमाण खालील गटात मोडते.

१) C : n =भरपूर कर्बोदके व अल्प नत्र

२) c: N = अल्प कर्बोदके व भरपूर नत्र

३) c : n= अल्प कर्बोदके व अल्प नत्र

४) C : N = भरपूर कर्बोदके व भरपूर नत्र

या गटापैकी पहिल्या गटातील स्थिती असल्यास कोणत्याही बहाराची भरपूर फुले निघतात. त्यामानाने पालवी कमी असते. झाडावर फळांची संख्या पुष्कळ असून फळे झुपाक्यात लागतात एका झुपाक्यात ३ ते ४ फळे लागण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र फळे आकाराने मोठी वाढत नाहीत. जोड फळातील काही फळांची विरळणी करून मोजकी फळे ठेवली तरी राखून ठेवलेल्या फळांचा आकार वाढत नाही. उत्पादन कमी निघते. याचा दुसरा परिणाम असा होता कीपुढील बहार उशिराने निघतोकमी फुले लागतातफुले येण्याचा कालावधी वाढतो आणि दुसर्‍या हंगामातही उत्पादन कमी निघते. लागोपाठ दोन हंगामात उत्पादन कमी निघाल्यामुळे एकूण नुकसान वाढते.

यातील दुसर्‍या गटाची अवस्था असेल तर बहार धरताच लवकर पालवी येतेपालवी जोमदार वाढतेफुले उशिराने लागतातफुलगळ अधिक होते. फळांची संख्या कमी असते. फळांची संख्या कमी असूनही त्यांचा आकार लहान राहतो. उपलब्ध अन्नसाठा पालवी वाढण्याकडे खर्च होतो आणि फळांचे पोषण अपूर्ण राहते. अशा वेळी फळे रोगांना लवकर बळी पडतात. त्यांची गुणवत्ता कमी दर्जाची असते. अशा परिस्थितीनंतर येणारा दुसरा बहार मात्र चांगला येतो.

तिसर्‍या गटाची अवस्था तर फारच हानिकारक ठरते. साठीव अन्न आणि नत्र यांचे प्रमाण अल्प असल्यामुळे पालवी खुरटतेफळे कमी व लहान राहतात आणि एकूण झाडाची अवस्था खुरटलेली दिसते. अशी अवस्था सुधारणे अवघड आणि खर्चिक जाते.

डाळींब झाडांची चौथ्या गटातील अवस्था योग्य समजली जाते. या अवस्थेत भरपूर अन्नसाठा आणि त्यास समतोल असे नत्र असल्यामुळे फुले आणि पालवी भरपूर येते. फळधारणा चांगली होत असल्यामुळे फळांची संख्याही भरपूर येते आणि त्याचबरोबर पालवी चांगली असल्यामुळे फळे मोठी होतात. फळांची गुणवत्ता वाढविणे सोपे पडते. या बहाराची फळे वेळेवर तयार होतात आणि पुढच्या बहारावरही विपरीत परिणाम होत नाही.

बहार धरतानाया चार अवस्थांपैकी चौथी अवस्था असणे हे फायदेशीर ठरतेतथापि ही अवस्था आपोआप अथवा नैसर्गिकरीत्या घडून येईल असे मात्र नाही. आणि ती तशी घडवून आणणे कोणत्याही बहाराचा पाया आहे हे ध्यानात घ्यावे.

नैसर्गिकरित्या वर्षभरात ३ वेळा बहार येतो. तथापि योग्य अवस्था कोणत्या बहारासाठी आहे त्यासाठी खालील तीन बाबींचा विचार करूनच बहार धरण्याची प्रक्रिया सुरू करावी.

१) बाजारपेठेतील मागणी : डाळींबाच्या फळांना कोणत्या काळात आणि कोणत्या बाजारपेठेतून मागणी असते याचा प्रथम विचार करावाम्हणजे त्यानुसार बहार धरणे सोईचे ठरेल.

२) हवामान : हिवाळा उन्हाळा आणि पावसाळा हे तीन हंगाम आपल्याकडे आहेत. हिवाळ्यातील कडक थंडी उन्हाळ्यातील उच्च तापमान आणि पावसाळ्यातील अधिक आर्द्रता यांचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन बहाराची निवड करावी.

३) पाण्याची उपलब्धता : डाळींब हे काटक वर्गातील फळझाड असले तरी बहार काळात पाण्याची गरज असते. जास्त पाणी मात्र या फळास घातक ठरते. पाणी टंचाई आहे काय ती कधी आणि किती प्रमाणात आहेयाचा विचार करून बहाराची निवड करावी.

एकदा बहाराची निवड केल्यानंतर त्यात बदल करू नये. निदान ५ वर्षांसाठी तरी बहार धरण्याचा कार्यक्रम पक्का करावा.

बहार धरण्यासाठी करावयाचे उपाय :

नैसर्गिक बाबींचा विचार करून इच्छित वेळेस फुले आपणे म्हणजे बहर धरणे होय. पण हा अर्थ फारच ढोबळमनाने वापरला जातो. बहार धरायचा म्हणजेबागेचे पाणी तोडायचेजमिनीची मशागत करायची आणि खाते घालून पाणी द्यायचे. या प्रत्येक बाबींचा कार्यकारणभाव काय असतो याचा विचार सहसा केला जात नाही. बहारापुर्वी बागेचे पाणी तोडायचे याचे कारण शेंडावाढ व पानेवाढ थांबवायचीम्हणजे नवीन वाढ होण्यासाठी जे अन्न खर्ची पडतेते वाचवून खोड- फांद्यात साठवून ठेवायचे. मशागत करण्याचाही तोच मुख्य उद्देश की जेणेकरून तंतुमुळे तुटून त्यांचे कार्य बंद पडेल. पाणी तोडून मशागत केली की पानगळ होते. ज्यावेळी वर्षातून

एकच ठराविक बहार घेतला जातो. त्यावेळी अशी पानगळ होण्यापुर्वीच झाडाच्या खोडात - फांद्यात पुरेसे अन्न साठवलेले असते आणि त्यामुळे बहाराची फुले निघण्यास अडचण पडत नाही. पहिल्या बहारानंतर दुसरा बहार धरण्यापुर्वी खोड फांद्यात पुरेसे अन्न साठले पाहिजे म्हणजे दुसरा बहार घेणे सुलभ होते. या प्रक्रियेत महत्त्वाची बाब म्हणजे पानगळ होणे ही होय. बहार धरताना झाडावरील नैसर्गिक पानगळ म्हणजे खोड- फांद्यात पुरेसे अन्न साठले आहे याची खूणच होय.

डाळींब झाडावर नवीन पालवी येते तेव्हा तिचा रंग पिवळसर तांबूस असतो. पालवी गर्द हिरव्या रंगाची व्हायला १५ - २० दिवस लागतात. त्यानंतर पानांचे कार्य जोमाने सुरू होते. कर्बग्रहणाची ही क्रिया सुमारे ६ आठवडे चालली की तेवढ्या अवधीत भरपूर अन्न तयार होते. अन्न साठविण्याची क्रिया पूर्ण होत आली की पानगळ व्हायला सुरुवात होते. हवामानानुसार पूर्ण पानगळ व्हायला २ ते ३ आठवडे लागतात. याचा अर्थ असा कीनवीन पालवी येऊन तिचे कार्य पूर्ण होऊन परत पानगळ व्हायला अशा एकूण कालावधी १० ते १२ आठवडे (७० ते ८४ दिवस) एवढा लागतो.

पावसाळ्यात पालवी लवकर निघते पण ती पक्क अवस्थेत यायल उशीर लागतो. पानांची कार्यक्षमता ढगाळ हवामानामुळे कमी होते आणि याचा परिणाम म्हणून हस्त बहार येण्यात अडचणी निर्माण होतात. हिवाळ्यामध्ये कडक थंडीच्या प्रभावामुळे पालवी जोमदार निघत नाही. पण पानांची कार्यक्षमता चांगली राहिल्यामुळे आंबेबहार चांगला निघतो. उन्हाळ्यात जी पालवी निघते ती जोमदार असते. कडक उन्हाळ्यात आणि पाणी टंचाई काळात पानांचे कार्य व्यवस्थित होऊनही अन्नसाठा भरपूर प्रमाणात साठत नाही. त्याचा परिणाम म्हणून मृग बहार उशिराने निघतो. पालवी येणे. ती तयार होणे आणि नंतर पानगळ होणे या तीन अवस्थांचा मेळ बसणे मूळत: आवश्यक आहे. यापैकी कोणत्याही एका बाबीत कमतरता राहिली तरी पुढील बहारावर विपरीत परिणाम होतो. ज्यावेळी संजीवकांचा अथवा रासायनिक द्रव्यांचा वापर करून पानगळ केली जाते त्यावेळी खात्रीचा बहार येण्यास अडचण पडते. जोमदार पाने कार्यरत असतानाच कृत्रिम उपचाराने पानगळ केली तर अन्नसाठा अपुरा राहतो आणो त्याचा परिणाम म्हणून बहार उशिराने आणि कमी प्रमाणात निघतो. फुले येण्याची क्रिया बरेच दिवस चालू राहते. शिवाय फुलगळीचे प्रमाणही वाढते. यावर उपाय म्हणजे पानगळ करून घेण्यापूर्वी खोडा - फांद्यात पुरेसा अन्नसाठा झाला किंवा नाही याचा विचार करायला हवा. नसेल तर तो करून घ्यायला हवा.

कमी कालावधीत पुरेसा अन्नसाठा करण्यासाठी दोन प्रकारची कामे करावीत. एक म्हणजे नवीन पालवी लवकर हिरवीगार होण्यासाठी पंचामृत फवारणी वेळापत्रकाप्रमाणे करावी म्हणजे पानांची कर्बग्रहणाची क्षमता वाढते. नवीन पालवीपानांची कार्यक्षमता आणि पानगळ या तिन्ही अवस्थेत पंचामृत औषधांचा वापर केल्याने सुलभ ठरते. या तिन्ही अवस्था नैसर्गिकरीत्या पूर्ण होऊ शकल्या नाही तर अशा वेळी या फवारणीचा उपयोग होतो. ज्यावेळी हुकमी बहार घेऊन खात्रीचे उत्पादन घ्यायचे असते तेव्हा केवळ नैसर्गिक परिस्थितीवर विसंबून कार्यभाग साधत नाही. हा उपचार करताना पाणी तोडणे. मशागत करणे आणि पानगळ करणे म्हाणजे बहाराची पूर्व तयारी झालीअसे समजणे योग्य नाही तर मूळ तत्त्व समजून घेतले पाहिजे आणि त्याची हवामानाशी सांगडही घातली पाहिजे. 
---*---

अशा हिमतीच्या विद्याताई
-
Saturday, January 16, 2016 AT 03:15 AM (IST)
Tags: agro special
संकट येताना मैदान सोडून पळण्याऐवजी परिस्थितीनुरूप शेतीत बदल व पर्याय निवडून त्यांचा सामना करण्याचे धारिष्ट्य बीड जिल्ह्यातील डिघोळांबा येथील विद्या रुद्राक्ष व त्यांचे पती बाबूराव यांनी दाखवले. शेती सेंद्रिय पद्धतीने करताना त्यांनी उत्पादन खर्च कमी केला. जे काही पिकवायचे त्यावर प्रक्रिया करून त्याची विक्री सुरू केली. संकटांची तीव्रता घटविण्यासह शेतीला शाश्वततेकडे नेण्याचे त्यांचे प्रयत्न सफल ठरले आहेत. सर्वांना मार्गदर्शक असेच ते आहेत. 
संतोष मुंढे 

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्‍यातील डिघोळांबा येथील विद्या बाबूराव रुद्राक्ष या अत्यंत जिद्दीच्या महिला शेतकरी. बी. एस्सी. (मायक्रो बायोलॉजी) चे शिक्षण घेतलेल्या विद्याताईंचे पती कोकण कृषी विभागात सेवेत होते. तेथील हवामान कुटुंबाला न मानवल्याने त्यांनी १९९३ च्या सुमारास स्वतःच्या गावी डिघोळांबा येथे येऊन वडिलोपार्जित १५ एकर शेती कसण्याचा निर्णय घेतला. पत्नीची शेतीतील आवड पाहून बाबूरावांनी सात वर्षांची सेवा बाकी असताना २०१० मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. पत्नीला शेतीत संपूर्ण साथ देणे सुरू केले. जमीन हलकी व मध्यम स्वरूपाचीत्यात खूप कष्ट व काटेकोर नियोजन करावे लागे. त्यातच गेल्या तीन- चार वर्षांपासून दुष्काळाचे संकट भेडसावत आहे. मात्रत्यावर मात करण्याची जिद्द विद्याताईंनी सोडली नाही.

अवलोकनातून केले बदल 
भरपूर उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खतेकीडनाशके यांचा वारेमाप वापर केला जातोयही बाब चिकित्सक स्वभावाच्या विद्याताईंच्या नजरेत आली. उत्पादन खर्च वाढल्याने मिळणाऱ्या उत्पन्नात अपेक्षित वाढ होत नसल्याचे लक्षात आले. त्यादृष्टीने बदल करण्याचे ठरवून अंमलबजावणीही सुरू केली. पशुधन वाढवून शेणखताची पूर्तता घरच्या घरीच करण्याची सोय केली.

जमिनीच्या सशक्‍तीकरणावर भर 
जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी शेतातीलच निविष्ठांचा वापर सुरू केला. शेण आणि गोमूत्रापासून जीवामृत तयार केले. गांडूळ खतकंपोस्ट खत तयार केले. शेतातील काडीकचरा जागेवरच कुजविण्यास सुरवात केली. पीक फेरपालटीसह मिश्रपीक पद्धतीचा अवलंबएकदल व द्विदल पिकांचा अंतर्भाव करून जमिनीमध्ये जीवाणूंची रेलचेल वाढविण्यावर भर दिला. हिरवळीच्या खतासाठी तागही घेतला जातो. कीडनाशक व संजीवक म्हणून गोमूत्राचा वापर होतो.

थांबविली जमिनीची धूप 
जमिनीच्या वरच्या थरात पिकासाठी पोषक घटक भरपूर प्रमाणात असतातत्यामुळे जमिनीची धूप थांबविणे ही महत्त्वाची गोष्ट समजून शेताची बांधबंदिस्ती केली. बांधावर कडुलिंबासारखी झाडे व पावसाचे पाणी वाहून जाऊ नये म्हणून गवत लावले. पाणी जमिनीत मुरविण्यासाठी उताराला आडव्या पेरणीचे तंत्र अवलंबिले. सन २०१० मध्ये बाबूरावांनी ट्रॅक्‍टर विकत घेतला. नेमके त्याचवर्षी लगतच्या तलावातील पाणी आटल्यामुळे ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने सुमारे एक हजार ट्रॉली गाळ शेतात टाकला.

पाण्याचे व्यवस्थापन 
सिंचनासाठी विहीर हेच एकमेव साधन असल्याने ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. पाण्याचा काटकसरीने वापर केल्याने जेमतेम पाणी असूनही पंधरा एकर शेती पाण्याखाली आणण्यात यश मिळविले. यंदा पाऊसच झाला नाहीत्यामुळे उपलब्ध पाण्यावर अाले व हळदीचे पीक वाचविण्यासाठी कसरत सुरू आहे.

असे आहे पीक नियोजन 
विद्याताईंनी चार एकरांवर केसर आंब्याची लागवड केली. सध्या भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. गेल्यावर्षी आंब्याची पाच झाडे वाळून गेली. त्यावर लागलीच विचारमंथन करून झाडांभोवती जैविक आच्छादन तयार केले. गरजेनुसार पॉलिमल्चिंगचाही वापर केल्याने बाष्पीभवनाचा वेग कमी झाला. दिलेल्या पाण्यामुळे जैविक पदार्थांचे विघटन होऊन जिथल्या तिथे खतनिर्मिती झाली. उसात पाचटाचे आच्छादन ठेवले. यंदा दीड एकर उसापैकी एक एकर ऊस तग धरून आहे. यंदा त्याचा उपयोग चारा म्हणून करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. अर्धा एकर अालेपाऊण एकरावर हळदीचे पीक कायम घेतले जात आहे. आंबा बागेत हळदअाले याबरोबरच सोयाबीनज्वारीगहूहरभरा आदी आंतरपिके घेत उत्पन्न वाढवले. रासायनिक निविष्ठांवरील खर्चावर अंकुश आल्याने उत्पादन खर्च कमी झालात्यामुळे उत्पादनात थोडी घट आली तरी शेती तोट्यात गेल्याचा अनुभव अजून तरी आला नाही. शेतीत वडील डॉ. महादेव रुद्राप्पा पाचेगावकरसुभाष पाळेकरतसेच डिघोळांबा येथील दिनदयाल कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. चंद्रमणी त्रिपाठीममता त्रिपाठी आदींचे मार्गदर्शन लाभते.

घरपरिसरातील वृक्षसंपदा 
नारळआंबाचिकूडाळिंबअंजीरपेरूसीताफळकागदी लिंबूबदाम केळी आदी फळझाडांसह आवळाहिरडाबेहडाकोरफडअळूतुळसतसेच घर सुशोभित करण्यासाठी गुलाबमोगरारातराणीस्वस्तिकशेवंतीपारिजातकजुईचाफानिशिगंधजास्वंद आदींचीही लागवड.

जनावरांचे व्यवस्थापन 
विद्याताईंच्या शेतीचा कणा म्हणजे चार गायी व दोन बैल. त्यांच्यापासून मिळणारे शेण व गोमूत्र वरदानासारखे आहे. त्यांच्यासाठी चारा पिके जास्त घेण्यावर त्यांचा भर असतो. वैरणीबरोबरच ज्वारीचेही चांगले उत्पादन मिळाले. गव्हाचे काडहरभऱ्याचे भुस्कटगूळधान्याचा भरडा वापरून त्या पौष्टिक खुराक तयार करतात.

ऊर्जानिर्मिती 
जनावरांचा दुष्काळात सांभाळ करणे जिकिरीचे असले तरी त्यांच्यासारखी फायद्याची गोष्ट दुसरी कोणती नाही हे विद्याताईंनी जाणले आहे. शेणाचा जागरूक वापर करण्यासाठी गोबर गॅस संयंत्र तयार केलेत्यामुळे इंधनाचा प्रश्नही सुटला. एलपीजी गॅसचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. गोबरगॅसमुळे इंधनाची बचत होउन त्यांच्या कुटुंबापुरती का होईनालाकूडतोड थांबली. झाडांमुळे जमिनीची धूप थांबली. रासायनिक खते व कीडनाशकांचा अतिरेकी वापर थांबल्यामुळे पाण्यासह हवेचे प्रदूषण टाळता आले. शेतातील वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत झाली.
शेतमालाचे मूल्यवर्धन 
जे काही पिकवू त्यावर प्रक्रिया करण्याचे तंत्र वापरले जाते. तूरहरभरामुगाची डाळ तयार करून ती बाजारपेठेतील दरांनुसारतर हळदीची पावडर किलोला २४० रुपये दराने विकली जाते. सोयाबीनमध्ये मिश्रपीक सूर्यफूल घेऊन घराची तेलाची गरज व जनावरांसाठी ढेप मिळविली जाते.
जपली सामाजिक बांधीलकी 
आपले ज्ञान आपल्यापुरतेच मर्यादित राहू न देता आसपासच्या शेतकऱ्यांनाही त्यात सामावून घेण्याचा प्रयत्न विद्याताईंनी केला. स्वतःबरोबर जवळपास बारा जणांना रोजगार देण्याची क्षमता निर्माण केली. बचत गटाची निर्मिती केली. गटामार्फत गरजवंतांना अत्यल्प व्याजदरात कर्जपुरवठा केला जातो.
दरवर्षी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने बचत गटाच्या माध्यमातून मुलांचे शिक्षणपरिवाराचे आरोग्य याविषयीचे कार्यक्रम घेण्याकडे त्यांचा अोढा असतो.
शेतीतील कामाचा झाला गौरव 
बळिराजा मासिक तसेच सेंद्रिय शेतीतील कार्यासाठी औरंगाबाद कृषी विभागदूरदर्शनलातूर येथील बसवेश्वर प्रतिष्ठानमहिला आर्थिक विकास महामंडळ बीड व जिल्हा पाणलोट कक्ष तथा माहिती केंद्र कृषी विभाग बीड आदींमार्फत विद्याताईंचा सन्मान करण्यात आला आहे. २०१५ मध्ये पंजाबमधील चंदिगड येथे झालेल्या राष्ट्रीय सेंद्रिय शेती संमेलनातही त्यांना पीक संरक्षण व कमी खर्चाचे पर्याय या विषयावर मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानेही त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.
मुलगा करतोय आयआयटीत एम.टेक. 
विद्याताईंचा मुलगा अविनाश बीई’ झाला. त्यानंतर एक वर्ष त्याने शेती व जनावरे सांभाळली. त्यानंतर त्याने आयआयटीची एम.टेक.ची परीक्षा दिली. त्यात देशभरात २६६ व्या श्रेणीने तो उत्तीर्ण झाला. आज तो कानपूर येथील आयआयटीमध्ये एम.टेक.च्या द्वितीय वर्षात शिकतो आहे. दुसरा मुलगा
आशुतोष अहमदाबाद येथे आघाडीच्या कंपनीत डिझाइन इंजिनिअर आहे. मुलांना एका विशिष्ट शिक्षणासाठी कधीही सक्ती केली नाही. त्यांना जे आवडते त्यात त्यांनी पुढे जावेहीच वृत्ती आम्ही जोपासली. आज मुले उच्चशिक्षित झाल्याचा आनंद असल्याचे विद्याताई म्हणाल्या. 
---*---

मार्डी येथे फुलतेय संत्र्यासोबत चंदनाची शेती
Monday, February 29, 2016 AT 06:00 AM (IST)
Tags: agro special
संत्रा बागेमध्ये चंदनाची लागवड करीत शेतीतून दीर्घकालीन उत्पन्नाचे नियोजन मार्डी (जि. अकोला) येथील चरणसिंह ठाकूर यांनी केली. ते मूळ उत्तर प्रदेशातील असलेतरी मराठीचा टिळा अभिमानाने लावतात. त्यांच्या या संत्रा व आंबा बागेमुळे परिसरामध्ये संत्रा शेतीला प्रेरणा मिळाली आहे. 
गोपाल हागे 

चंदनाचे नाव उच्चारले तरी सुगंधाची अनुभूती होते. चंदनाची झाडे तशी विदर्भाच्या जंगलात दिसून येत असलीतरी बहुमोल चंदनाची शेती हा प्रकार तर विदर्भासाठी नवीनच. जंगलातील झाडेही चोरांच्या नजरेतून न वाचल्याने आता दुर्मिळ झाली आहेत. मात्र अकोट तालुक्‍यातील मार्डी (जि. अकोला) या गावात चरणसिंह ठाकूर नावाच्या शेतकऱ्याने चंदनाची शेती करण्याचे धाडस केले. त्यांनी आपल्या ४२ एकर संत्रा बागेत तब्बल साडेसात हजार झाडे लावलेली आहेत. आज ही अडीच ते तीन वर्षांची आहेत. परजीवी असलेले चंदनाचे झाड येथे चांगल्या पद्धतीने वाढताना दिसून येते. 

आदिवासी बहुल असलेले मार्डी गाव हे सातपुड्याच्या अगदी कुशीत वसलेले आहे. या गावाला लागूनच डोंगराची रांग आहे. या गाव शिवारात चरणसिंग ठाकूर यांची चार ठिकाणी एकूण ४८ एकर शेती आहे. त्यापैकी ४२ एकरामध्ये संत्र्याची बाग आहे. याच बागेत आंतरपीक म्हणून चंदनाची लागवड त्यांनी केली आहे. 

उत्तर प्रदेशातील पसौली (ता. छाता जि. मथुरा) येथील मूळ रहिवासी असलेले चरणसिंह ठाकूर हे कंत्राटदारीच्या व्यवसायामुळे साधारणतः १९९१ मध्ये महाराष्ट्रात आले. कामानिमित्त आलेले ते अकोटमध्ये स्थायिक झाले. त्यांनी २००० या वर्षी त्यांनी मार्डी शिवारात १२ एकर डोंगर विकत घेतला. हा डोंगर फोडूनसपाटीकरण केले. त्यात नजीकच्या धरणातील गाळाची माती टाकली. हळूहळू शेती खरेदी केल्याने त्यांची शेती ४८ एकरापर्यंत पोचली. सुरवातीच्या काळात या शेतामध्ये पारंपरिक पिकांसह मुसळी (२० एकर) व शतावरी (२ एकर) यासारखी औषधी वनस्पतींचे उत्पादन घेतले. मुसळीचे एकरी पाच क्विंटल (वाळवलेले)तर ओले २५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असे. त्या वेळी वाळलेल्या मुसळीला १००० ते १२०० रुपये प्रति किलो असा दर मिळत असे. शतावरीपासून एकरी ३ क्विंटल उत्पादन मिळत असे. त्याला साधारण ५०० रुपये प्रति किलो दर मिळत असे. त्याच बरोबर आलेहळद यांसारखी पिकेही प्रायोगिक तत्त्वावर अर्ध्या एकरावर घेऊन पाहिली. मात्र २००६ पासून त्यांनी आपला मोर्चा फळबागेकडे वळवला. आज त्यांच्याकडे ४२ एकर क्षेत्रात ५ मीटर बाय ५ मीटर अंतरावर सुमारे ६ हजार संत्रा झाडे आहेत. तीन एकरामध्ये दशहरी जातीच्या आंब्याची लागवड आहे. या बागेला त्यांनी सातपुडा कृषी फार्म’ असे नाव दिले. अकोटपासून २२ किलोमीटरवर हे शेत असूनचरणसिंह यांचे वास्तव्य हे अकोट येथे असते.

महाराष्ट्रात आलेमहाराष्ट्राचेच झाले 
कोणताही व्यक्ती ही उत्तर प्रदेशातील आहेम्हटल्यानंतर स्वाभाविकपणे त्यांच्याशी बोलताना आपल्या तोंडीही हिंदी येते. मात्र त्यांनी मी उत्तर प्रदेशातील असलो तरी चांगल्या प्रकारे मराठी बोलतो’ असे म्हणत माझी विकेट घेतली. त्यांचे सासरही वडारी देशमुख (ता. अकोट) येथील असूनआपण संपूर्ण महाराष्ट्रीय झाल्याने त्यांनी गर्वाने’ सांगितले. ते केवळ मराठी बोलतच नाहीततर ॲग्रोवनचे सुरवातीपासूनचे वाचकही आहेत.

चंदन शेतीला सुरवात 
ॲग्रोवनचे वाचक असलेल्या ठाकूर यांच्या वाचनामध्ये चंदन शेती व रोपांबाबतची एक जाहिरात आली. त्यांनी अधिक चौकशी केली असता हे पीक त्यांना भावले. त्याबाबत माहिती गोळा करत त्यांनी चंदनाचे माहेरघर मानले जाणारे म्हैसूर (कर्नाटक) गाठले. चंदन शेती मुळातून समजून घेतल्यानंतर चंदन लागवडीचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये म्हैसूर येथील वनविभागाच्या रोपवाटिकेतून चंदनाची २००० रोपे (प्रति रोप १० रुपये किमतीने) आणली. संत्र्याच्या दोन ओळींमध्ये एक ओळ चंदनाचे रोप लावले. शिवाय धुऱ्यावरही चंदनाची झाडे लावली. पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्याने झाडे जगली. जेथील झाडे गेलीत्या ठिकाणी नवीन रोप लावले. नांग्या भरण्यासाठी दरवेळी कर्नाटकातून रोपे आणण्याऐवजी१५०० रुपये प्रति किलो प्रमाणे १२ किलो चंदनाचे बीज आणून त्यांनी स्वतः चंदनाची रोपवाटिका बनविली. बागेतील चंदनाची झाडे वाढवत ७५०० पर्यंत पोचली. अन्य शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देत काही रोपे दिली. संत्र्याच्या सिंचन व खत व्यवस्थापनातूच चंदनालाही ते मिळते. त्यामुळे वेगळा खर्च करावा लागत नाही. सध्या अडीच ते तीन वर्षांची असलेली रोपे १० ते १२ वर्षे सांभाळावी लागणार आहेत. भविष्यात ही झाडे चोरापासून जपण्यासाठी खर्च करावा लागणार आहे. त्याचे नियोजन त्यांनी केले असूनसौर कुंपण व सुरक्षारक्षकांची नेमणूक करणार आहेत.

बहुमोल चंदन - 
सद्यःस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चंदनाला चांगली मागणी आहे. भारतात सोन्याइतकेच चंदन मौल्यवान आहे. १२ ते १५ वर्षांनंतर साधारणतः ५० ते ६० किलो गाभ्याचे लाकूड मिळते. त्यात सुगंध व तेलाचे प्रमाण अधिक असते. भारतात चंदनाला सहा हजार रुपये प्रतिकिलोचा दर आहे. देशात म्हैसूरबंगळूरउटीकोइमतूरहैदराबादकन्नोजकानपूरकोलकता आदी शहरांमध्ये चंदनाच्या विविध उत्पादनांचे कारखाने आहेत. देशात मागणीच्या तुलनेत पुरवठा नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

संपूर्ण बाग ठिबकवर - 
परिसरामध्ये एक किलोमीटर अंतरात दोन धरणे व एक मोठा तलाव असल्याने भूजलाची पातळी वर आहे. मात्र डोंगर पायथ्याला मुरमाड व खडकाळ असलेल्या जमिनीत पाण्याचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक आहे. त्यासाठी त्यांनी संपूर्ण बागेत ठिबक बसविले असूनत्याद्वारे पाणी व खताचे व्यवस्थापन केले जाते.
शेतामध्ये चार विहिरी आणि ५ कूपनलिका आहेत. शेताच्या शेजारी असलेल्या नाल्यावर सिमेंट बांध घालत जलसंधारणाची कामेही त्यांनी केली आहेत. तसेच संपूर्ण शेताच्या चारही बाजूंनी बांधबंदिस्ती केली. शिवाय जनावरांचा त्रास रोखण्यासाठी तारेचे कुंपण केले.
कीडनियंत्रणासाठी प्रत्येक फवारणीवेळी ते गोमूत्राचा वापरही नियमितपणे करतात.

संत्रा व आंबा ताळेबंद - 
संत्र्याचे तीन बहर घेतले असूनसध्या चौथ्या बहराची फळे बागेत लगडलेली आहेत. २०१४ मध्ये ४२ एकर संत्रा बागेतून १०० टन संत्रा फळे मिळालीत्याला प्रति किलो २५ रुपये दर मिळाला. २०१५ मध्ये ३२० टन संत्रा उत्पादन मिळालेत्याला ३१ रुपये ५० पैसे प्रति किलो दर मिळाला.
दशहरी आंब्याचे दोन बहर घेतले असूनसध्या त्या बागेत मोहर फुलला आहे. २०१३ मध्ये आंब्याचे १०० क्विंटल उत्पादन मिळालेती बाग अडीच लाखांमध्ये विकली होती. २०१४ मध्ये १२५ क्विंटल फळे मिळालीतर बागेला एकूण २.५ लाख रुपये मिळाले.
फळांची विक्री हुंडी सौदा पद्धतीने करत असल्यामुळे काढणीक्रेट्सवाहतूक यांचा खर्च वाचत असल्याचे त्यांनी सांगितले.

संपर्क -
चरणसिंह ठाकूर९८५०५६८०८५.


---*---

No comments:

Post a Comment